ETV Bharat / city

निफाडच्या गावातील जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज, 10 किलोमीटर परिसर प्रतिबंधीत क्षेत्र घोषित - nashik update

नाशिकच्या निफाड तालुक्यातील जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज हा संसर्गजन्य आजार दिसून आला आहे. या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासनाने चार गावातील 10 किलोमीटरचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केला असून जनावरांच्या लसीकरणावर जोर दिला आहे.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Jul 25, 2021, 8:13 PM IST

नाशिक - नाशिकच्या निफाड तालुक्यातील जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज हा संसर्गजन्य आजार दिसून आला आहे. या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासनाने चार गावातील 10 किलोमीटरचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केला असून जनावरांच्या लसीकरणावर जोर दिला आहे.

निफाडच्या गावातील जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज, 10 किलोमीटर परिसर प्रतिबंधीत क्षेत्र घोषित

निफाड तालुक्यातील मौजे ओझर, शिंगवे, कोठुरे, विजयनगर या चार गावातील जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज हा आजार दिसून येत आहे. या आजाराची अधिक तीव्रता लहान वासरांमध्ये याची दिसून येत आहे. पशुमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव माशा, गोचडी, डास यांच्यामार्फत होत असल्याचे समोर आले आहे.

ही आहे आजाराची लक्षणे
लंपी स्किन डिसीज हा आज प्रामुख्याने गाय, म्हैस या जनावरांमध्ये अधिक दिसून येत आहे. या आजारात बाधित झालेल्या जनावरांना पोट, डोके, मान, पायाच्या त्वचेवर तीन ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात. ताप, भूक मंदावणे, नाकातून स्त्राव गळणे या आजारात मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी गाय म्हशीच्या दूध देण्यावर परिणाम होत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे.

चार गावात प्रतिबंधीत क्षेत्र घोषित
लंपी स्किन डिसीज हा साथीचा आजार असून या आजाराचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी निफाड तालुक्यातील मौजे ओझर, शिंगवे, कोठुरे, विजयनगर या गावात 10 किलोमीटर पर्यंत प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या भागात जनावरांची वाहतूक व विक्री बाजार भरावणाऱ्या बंदी घालण्यात आली आहे.

लसीकरण सुरू
निफाड तालुक्यातील चार गावात 27 बाधित जनावरांना सोडून, इतर पाच किलोमीटर भागातील 10 हजार 42 जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. अजून 8 हजार 500 लसीकरणाचे डोस बाकी असून ते टप्याटप्याने देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. जी आर पाटील यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - 'वादळं, कोरोना, महापूर हा मुख्यमंत्र्यांचा पायगुण, पाय बघायला पाहिजेत पांढरे आहेत का', राणेंची ठाकरेंवर सडकून टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.