ETV Bharat / city

सराफा व्यावसायिक मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन समिती, सीआयडीमार्फत होणार चौकशी - vijay birari murder case

शासकीय विश्रामगृह येथे सराफा व्यावसायिक विजय बिरारी यांचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. ही घटना घडली त्यावेळी बिरारी हे हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात होते. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या, याचे गूड कायम असले, तरी नाशिक पोलिसांनी आकस्मात मृत्यू झाल्याची नोंद केली होती.

murder
सराफा व्यावसायिक मृत्यू प्रकरण
author img

By

Published : Feb 26, 2020, 5:58 PM IST

Updated : Feb 26, 2020, 10:29 PM IST

नाशिक - शासकीय विश्रामगृह येथे सराफा व्यावसायिक विजय बिरारी यांचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. ही घटना घडली त्यावेळी बिरारी हे हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात होते. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या, याचे गूड कायम असले, तरी नाशिक पोलिसांनी आकस्मात मृत्यू झाल्याची नोंद केली होती. हे प्रकरण गंभीर असल्याने घटनेचा तपास न्यायालयीन समिती आणि सीआयडीमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. हैदराबाद पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करा, अन्यथा सराफ व्यावसायिकांनी पुकारलेले बेमुदत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

सराफा व्यावसायिक मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन समिती, सीआयडीमार्फत होणार चौकशी

मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांचा नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथील चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. चोरीचे सोने विकत घेतल्याच्या संशयावरून बिरारी हे हैदराबाद पोलिसांच्या सोमवारपासून ताब्यात होते. ते भाजपच्या व्यापारी संघटनेचे राज्य पदाधिकारी होते तर, त्यांची पेठरोडवरील शनी चौकात सराफी पेढी आहे. त्यांच्या मृत्यूनंतर आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याचे गूढ मात्र अजूनही कायम आहे. बिरारी यांना हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते. मात्र, त्यांनी लक्ष दिले नाही म्हणून त्यांची चौकशी करा, अशी मागणी करत हैदराबाद पोलिसांनीच ही हत्या केली, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

अमोल तांबे - पोलीस उपायुक्त, नाशिक शहर, परिमंडळ 1

या सगळ्या प्रकरणानंतर सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याबाबत नाशिकमधील सराफा व्यावसायिकांनी निषेध सभा घेत कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. जोपर्यंत हैदराबाद पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

यापूर्वीदेखील अनेक नाशिकच्या सराफा व्यावसायिकांना तपासकामी ताब्यात घेत छळवणूक केलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणानंतर आता हैदराबाद पोलिसांची सीआयडीमार्फत चौकशी करून खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू, अशा पद्धतीचा इशारा नाशिकच्या सराफा असोसिएशनकडून देण्यात आला आहे.

नाशिकच्या पंचवटीत राहणाऱ्या अशोक नांग्या शिंदे या संशयित आरोपीने हैदराबादमध्ये जवळपास शंभरहून अधिक गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. त्यात केलेल्या घरफोड्या अधिक असून त्यात असलेले सोने विक्रीवरून अनेकांची तपासणी सुरू होती. त्यामुळे अनेक घटनांची उकल होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हैदराबाद पोलिसांचा तपास संशयास्पद असल्याने त्यांची आता न्यायालयीन समिती आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत कसून चौकशी केली जाणार असल्याचे नाशिक पोलिसांनी सांगितले आहे.

Last Updated : Feb 26, 2020, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.