ETV Bharat / city

नाशिक : पुढील आठवड्यात कांद्याचे दर गाठणार शंभरी - कांद्याचे भाव शंभरीच्या दिशेने

नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले असून, नाशिकच्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी झाली आहे. सध्या कांद्याला सरारारी 5 ते 6 हजार रुपये भाव मिळत असून, हाच कांदा किरकोळ बाजारात ग्राहकांना 70 ते 75 रुपये किलो भावाने खरेदी करावा लागत आहे. मात्र अशीच परिस्थिती राहिल्यास पुढील आठ दिवसात कांद्याचे भाव 100 रुपयांपर्यंत जातील असा अंदाज आहे.

onions news
कांद्याच्या दरात वाढ
author img

By

Published : Oct 19, 2020, 5:56 PM IST

नाशिक - नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले असून, नाशिकच्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी झाली आहे. सध्या कांद्याला सरारारी 5 ते 6 हजार रुपये भाव मिळत असून, हाच कांदा किरकोळ बाजारात ग्राहकांना 70 ते 75 रुपये किलो भावाने खरेदी करावा लागत आहे. मात्र अशीच परिस्थिती राहिल्यास पुढील आठ दिवसात कांद्याचे भाव 100 रुपयापर्यंत जातील असा अंदाज आहे.

आंध्र प्रदेश, कर्नाटक, हैदराबाद येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन कांद्याचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाल्याने, याचा परिणाम कांद्याच्या बाजारपेठेवर झाला आहे. परिणामी कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिकच्या बाजार समितीत कांदा सरारारी 5000 ते 6000 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे.

सध्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे केवळ 20 टक्केच कांदा शिल्लक असून, 80 टक्के कांद्याची व्यापाऱ्यांनी साठवणूक केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता या व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. केंद्र सरकारने कांदा दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्यातबंदीची घोषणा केली. मात्र तरी देखील कांद्याचे भाव वाढत असल्याने प्राप्तीकर विभागाने लासलगाव येथील नऊ कांदा व्यापाऱ्यांच्या कार्यालयात छापे टाकले, यात कांदा खरेदीच्या पावत्या, कांदाविक्रीची बिले तसेच कांदा साठवणूक याबाबत चौकशी केली. मात्र या छापेमारीत प्राप्तीकर विभागाच्या हातात नेमके काय लागत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र ज्या बड्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा साठवणूक केली आहे, त्यांना सोडून देत इतर लहान कांदा व्यापाऱ्यांवर कारवाई झाल्याची शेतकरीवर्गात चर्चा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.