नाशिक - नाशिक ही धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी असून येथे हवा चांगली असून निसर्गही चांगला आहे. त्यामुळे राज्यपालांनी राजभवन नाशिकला बांधावं म्हणजे आपल्या येण्याने आमची विकास कामे मार्गी लागतील. आरोग्य विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रम इमारतीचे काम लवकर सुरू करावे, म्हणजे दोन वर्षानी इमारतीचे उदघाटनही राज्यपालांच्या हस्ते करता, असा चिमटा भुजबळांनी राज्यपालांना लगावला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी छगन भुजबळ आणि राज्यपालांची चांगलीच जुगलबंदी रंगली.
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतन इमारतीचे आणि सोलर सिस्टीमचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कुलगुरू डॉ दिलीप म्हेसेकर, प्रती कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर आदी उपस्थित होते. नूतन इमारतीच्या कोणशिला अनावरणानंतर मुख्य कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कार्यक्रमात बोलताना भुजबळ व राज्यपाल 'हम तब भी आपके साथ रहेंगे' नाशिक ही धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी असून येथे चांगली हवा असून निसर्ग चांगला आहे. त्यामुळे राज्यपालांनी राजभवन नाशिकला बांधावं म्हणजे आपल्या येण्याने आमची विकास कामे मार्गी लागतील. आरोग्य विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रम इमारतीचे काम लवकर सुरू करावे म्हणजे दोन वर्षानी इमारतीचे उदघाटन ही राज्यपालांच्या हस्ते करता येईल, त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भुजबळांकडे बघून म्हटलं "तब तक क्या सीन रहेगा" यावर भुजबळ यांनी म्हटलं हम तब भी आपके साथ रहेंगे, म्हटल्यावर सभागृहात एकच हशा पिकला.
कोविडने सगळ्यांचे डोळे उघडले -कोविड सारख्या महामारीने आपल्या सगळयांचे डोळे उघडले. त्यामुळे आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी ज्या-ज्या आवश्यक गोष्टी आहेत. त्या-त्या पूर्ण करा. ही महामारी पुन्हा येणार नाही हे, सांगता येत नाही. त्यामुळे आपण सतर्क राहिले पाहिजे. आरोग्य विद्यापीठाने वेगवेगळे कोर्स सुरू केले पाहिजे. आपल्याकडे व्हेंटिलेटर आहे मात्र ऑपरेटर मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. यासाठी डॉक्टरांसोबत टेक्निशन तयार व्हायला हवेत.
जो डर गया समजो मर गया - राज्यपालखरा लीडर आपत्कालीन परिस्थितीत लक्षात येतो. कोरोना काळात मंत्री अमित देशमुख आणि कुलगुरू यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद होता. सध्या जग तरुणांचे आहे. कोरोनाला घाबरू नका, पण गाफीलही राहू नका, परीक्षा घेण्यास विरोध का होतो, हे मला कळत नाही असं राज्यपालांनी म्हटलं. भारतीय पुरातन पॅथी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुणकारक असून, याचं संशोधन आणि जनजागरण करावे, असा सल्ला राज्यपाल यांनी दिला. सोलर ऊर्जेवर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना प्रोत्साहन दिलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलर ऊर्जा निर्मितीला व्यापक केलं. असंही राज्यपालांनी म्हटलं.
कोरोना रोखण्यासाठी आपल्या पुरातन पॅथी गुणकारक - अमित देशमुख
कोरोना काळात विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय,प्रत्येक परीक्षार्थींना कोरोना कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला..राज्यपालांच्या सूचनांची पूर्ण अंमलबजावणी केली सौर ऊर्जा निर्माती करून ऊर्जा निर्माती करू.विद्यापीठाचत पुस्तकी नाही तर प्रायोगिक संशोधन करण्याचा निर्णय.5 हजार वर्ष पुरातन आयुर्वेदाचा पुन्हा एकदा अभ्यास..आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व विषयांना 15 दिवसात मंजुरी देणार असल्याचे वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं..