नाशिक नाशिकच्या बाजारात Nashik Market भाजीपाल्यांची आवक घटल्याने Arrival of Vegetables Decreased भाव तेजीत Vegetable Prices are Increasing असल्याचे पाहायला मिळाले. श्रावण सुरू असल्याने फळभाज्या, भाजीपाला खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मात्र, बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ Nashik Agricultural Produce Market Committee पोहचत आहे. गॅस, पेट्रोल, डिझेलपाठोपाठ भाजीपाल्याचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे.
शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी पालेभाज्या, फळभाज्यांची आवक कमी झाल्याने भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत असून, नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पेट्रोल, डिझेल सीएनजी गॅसचे भाव सातत्याने वाढत असून, दुसरीकडे फळभाज्या, पालेभाज्या तसेच डाळींचे भावदेखील वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहे.
नाशिकच्या बाजारात या तालुक्यांतून होते आवक नाशिक बाजार समितीत सिन्नर, नाशिक, पेठ, त्रंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, इगतपुरी या तालुक्यांतून भाजीपाला विक्रीसाठी येतो. परंतु, पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असल्याने 50 टक्के आवक घटली आहे. परिणामी किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नाशिक बाजार समितीत सिन्नर, नाशिक,पेठ, त्रंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, इगतपुरी, या तालुक्यांतून भाजीपाला विक्रीसाठी येतो. परंतु, पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असल्याने 50 टक्के आवक घटली आहे. परिणामी किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले..
अवाक घटल्याचा परिमाण नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मुंबई व उपनगरात दररोज 30 ते 40 ट्रक भाजीपाला पाठवला जातो. परंतु, सध्या आवक घटल्याने व्यापाऱ्यांना 15 ते 20 ट्रक भाजीपाला पाठवावा लागत आहे. तर गुजरात शहरातदेखील नाशिकमधून दररोज 12 ते 15 ट्रक भाजीपाला पाठवला जातो. परंतु, सध्या त्यातही घट झाली असून, केवळ 8 ते 10 ट्रक भाजीपाला पाठवला जात असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे.
श्रावण मासामुळे भाव तेजीत श्रावण महिन्यात हिंदू धर्मातील बहुतांश नागरिकांचे व्रतवैकल्य असते. त्यामध्ये अनेक जण श्रावण महिन्यात मांसाहार करणे टाळतात. त्यामुळे त्यांचा कल भाजीपाला, फळभाज्या यांच्याकडे जास्त असतो. दुसरीकडे संततधार पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे भाजीपाल्याच्या मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने भाजीपाल्यांचे भाव वाढत असल्याचे चित्र दिसून येते.
किरकोळ बाजारातील भाव भेंडी 80 रुपये किलो, दुधी भोपळा 30 रुपये नग, फरसबी 80 किलो, फ्लॉवर 70 रुपये किलो, गवार 70 रुपये किलो, घेवडा 70 रुपये किलो, ढोबळी मिरची 60 किलो, शेवगा शेंग 40 किलो, टोमॅटो 80 रुपये किलो.