नाशिक - नाशिकच्या गंगापूर रोड भागातील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावाने असलेल्या शस्त्र संग्रहालयाची (Balasaheb Thackeray Arms Museum) दुरावस्था झाली आहे. वीज बिल थकल्याने येथील वीज देखील खंडित करण्यात आली आहे. या संग्रहालयाला स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांनी शिवकालीन शस्त्र दिली होती.
हेही वाचा - National Drummer Day : संगीतात ड्रम वाद्याला विशेष महत्व.. पाहा विशेष रिपोर्ट
नाशिक महानगरपालिकेवर मनसेची सत्ता असताना गंगापूर भागात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भव्य शस्त्र संग्रहालय उभारण्यात आले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांच्या विनंतीवरून दिवंगत बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांनी नागरिकांना छत्रपती शिवाजी (chhatrapati Shivaji Maharaj) यांचा इतिहास कळावा यासाठी अनेक शिवकालीन शस्त्र (shivaji maharaj weapons) या संग्रहालयाला दिली होती. यावेळी या संग्रहालयाच्या उद्धाटन प्रसंगी राज ठाकरे यांच्या समवेत स्वतः बाबासाहेब पुरंदरे उपस्थित होते. मात्र, कालांतराने या शस्त्र संग्रहालयाची दुरवस्था झाली असून येथे कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. या संग्रहालयाचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आले आहे. मनसेकडून या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आल्याने सत्ताधारी भाजपच याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
मनसेकडून साफसफाई
दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेल्या शिवकालीन शस्त्रांचे राज्यातील एकमेव बाळासाहेब ठाकरे संग्रहालयाची दुरवस्था झाली आहे. या संग्रहालयात अनेक शिवकालीन शस्त्र आहेत. अशात आज मनसेकडून या संग्रहालयाची साफसफाई करण्यात आली. वीजबिल थकल्याने संग्रहालयाचे वीज कनेक्शन बंद असून मनसेकडून या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आल्याने सत्ताधारी भाजपचा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
बाळासाहेबांच्या नावाने सेना फक्त राजकारण करते
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे संग्रहालय उभारण्यात आले. या संग्रहालयाला दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यानी अनेक शिवकालीन शस्त्रे दिली आहेत. मात्र, आता या संग्रहालयाची दुरवस्था झाली आहे. महानगरपालिकेत असलेल्या सत्ताधारी भाजपसोबत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राजकारण करणारी शिवसेना देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याने वाईट वाटते. आज राज ठाकरे आणि दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या माध्यमातून हे शस्त्र संग्रहालय म्हणजे नाशिकसाठी एक अमूल्य ठेवा असल्याचे मत मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर (MNS Dilip Datir) यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - छत्रपतींचा इतिहास समजावा यासाठी पुरंदरे यांनी आयुष्य खर्ची घातले - शरद पवार