ETV Bharat / city

नाशिकच्या हॉटेल रामा हेरीटेजमध्ये सिलिंडरच्या स्फोटात कर्मचाऱ्याचा मृत्यू, नातेवाईंकडून घातपाताचा आरोप - working as a cook

रामा हेरीटेज हॉटेल मध्ये कर्मचाऱ्याचा सिलिंडरच्या स्फोटात मृत्यू झाल्याचे हॉटेल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र घटना घडल्यानंतर या बाबतची माहिती मृताच्या कुटुबीयांना वेळेत दिली नाही, त्यामुळे ही दुर्घटना नसून घातपात असल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईंकांनी केला आहे.

सिलिंडरच्या स्फोटात कर्मचाऱ्यांचा मृत्यू,

author img

By

Published : Sep 5, 2021, 11:26 AM IST

Updated : Sep 9, 2021, 11:19 AM IST

नाशिक - शहरातील प्रसिध्द रामा हेरिटेज हॉटेल मध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन रुपेश गायकवाड या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र ही आकस्मिक घटना नसून घातपात असल्याचा आरोप रुपेशच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिलिंडरच्या स्फोटाची ही घटना शऩिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.

सिलिंडरच्या स्फोटात कर्मचाऱ्यांचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाका भागातील रामा हेरीटेज हॉटेल मध्ये 4 सप्टेंबरच्या मध्यरात्री हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत हॉटेलमधील कर्मचारी रुपेश गायकवाड (वय 42) याचा मृत्यू झाला. मात्र घटना झाल्यानंतर अनेक तास उलटून सुध्दा हॉटेल प्रशासनाने घरच्यांना गायकवाड यांच्या मृत्यूची कल्पना सुद्धा दिली नाही. त्यामुळे ही दुर्घटना नसून घातपात असल्याचा आरोप गायकवाड यांच्या नातेवाईकांनी केला आहे. घटनेनंतर गायकवाड यांच्या नातेवाईकांनी हॉटेल परिसरात मोठी गर्दी करत गोंधळ केला आहे.घटनेच्या चौकशीची मागणी-

गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर माझे पती जखमी झाले होते,असे हॉटेल प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याच्या मृत्यूची माहिती आम्हाला दिली नव्हती. आम्हाला सिव्हिल रुग्णालयात यायला सांगितले. मात्र तिथे आम्हाला मृतदेह आढळून आला. त्यामुळे आम्हाला या दुर्घटनेबाबत हा घातपात असल्याचा संशय आहे. तसेच काही दिवसापूर्वी तिचे पती रुपेश यांचे हॉटेलच्या व्यवस्थापकासोबत भांडण झाले होते, असेही तिने पोलिसांनी सांगितले असून या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी कारावी अशी, मागणी मृतांच्या नातेवाईंकांनी केली आहे.

Last Updated : Sep 9, 2021, 11:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.