ETV Bharat / city

नाशकात पेट्रोल 90 रुपये, तर डिझेल 79 रुपयांवर... ग्राहक संतापले - petrol prices in nashik

पेट्रोलचा भाव 90 रुपये झाला असून डिझेलचे दर देखील वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

petrol prices in maharashtra
नाशकात पेट्रोल 90 रुपये, तर डिझेल 79 रुपयांवर... ग्राहक संतापले
author img

By

Published : Dec 5, 2020, 4:37 PM IST

Updated : Dec 7, 2020, 1:06 PM IST

नाशिक - पेट्रोलचा भाव 90 रुपये झाला असून डिझेलचे दर देखील वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

नाशकात पेट्रोल 90 रुपये, तर डिझेल 79 रुपयांवर... ग्राहक संतापले

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे भारतात पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईने वेग पकडला आहे. सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. नाशिकमध्ये पेट्रोलचे भाव 90 रुपये 20 पैसे, तर स्पीड पेट्रोलचे भाव 93 रुपये 61 पैसे लिटर वर जाऊन पोहोचले आहेत. तर डिझेलचे भाव देखील 79 रुपये 14 पैसे झाले आहेत. सतत होणाऱ्या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने पेट्रोलच्या भावावर अंकूश ठेऊन दर नियंत्रणात आणावे, अशा प्रतिक्रिया वाहनधारकांनी दिल्या.

कोरोना काळात स्वतःचे वाहन चालवण्यास प्राधान्य

नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रत्येक नागरिक स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक जण सार्वजनिक वाहतुकीला बगल देत स्वतःच्या वाहनाने प्रवास करणे सुरक्षित समजतात. त्यामुळे शहरात पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढली आहे.

कोरोना आणि वाढती महागाई

एकीकडे कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून दुसरीकडे महागाईचा भडका उडला आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देखील गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे कोरोना काळात सरकारने सर्वच महागाईवर नियंत्रण ठेऊन नागरिकांना दिलासा देणं गरजेचं असल्याचं नाशिककरांचं म्हणणं आहे

Last Updated : Dec 7, 2020, 1:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.