ETV Bharat / city

पालकमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर तरी समस्या सुटणार का? नाशिककरांचा सवाल - छगन भुजबळ बातमी

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज (मंगळवार) नाशिक शहरातील सराफ बाजार, दहिपुल, मेनरोड परिसराची पाहणी केली. काल (सोमवार) झालेल्या पावसात या परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नुसान झाले होते. याबाबत भुजबळ यांनी महापालिका आयुक्तांना तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

Chhagan Bhujbal Nashik City visit
छगन भुजबळ नाशिक शहर दौरा
author img

By

Published : Jun 16, 2020, 7:35 PM IST

नाशिक - जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज (मंगळवार) नाशिक शहराचा पाहणी दौरा केला. या पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील सराफ बाजार, दहिपुल, मेनरोड परिसराची पाहणी केली. काल (सोमवार) झालेल्या पावसात या परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले होते. याबाबत भुजबळ यांनी महापालिका आयुक्तांना तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या भागाची पाहणी करुन नेमक्या काय समस्या आहेत, हे जाणुन घेतले. यावेळी महापालिका आयुक्त तसेच स्मार्ट सिटीचे अधिकारी देखील उपस्थित होते. दरवर्षी येणाऱ्या या अडचणींचा नेमका पर्याय काय आहे, याचा देखील आढावा भुजबळ यांनी घेतला. दरम्यान सराफ बाजाराच्या कामांचा स्मार्ट सिटीच्या कामात समावेश करण्याचे आदेश भुजबळांनी यावेळी दिले. तसेच तज्ञांच्या मदतीने सरस्वती नाल्यासह ड्रेनेज लाईनचे काम मार्गी लावले जाईल, असेही भुजबळांनी यावेळी स्पष्ट केले.

नाशिक शहराच्या परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांसोबत संवाद साधला...

हेही वाचा... केंद्रीय पथक रायगडमध्ये दाखल, वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू

जमलेल्या नागरिकांनी यावेळी पालकमंत्री भुजबळ यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. नगरसेवक, महापालिका प्रशासनाचे अधिकारी फक्त आश्वासन देतात. मात्र, प्रत्यक्षात काम होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. दरम्यान पुढच्या पावसाळ्यापुर्वी या कामांना युद्धपातळीवर पुर्ण करण्याचे आदेश छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

दोन दिवसात एकाच वेळी जास्त पाऊस झाल्यामुळे गोदावरीच्या पात्रात पाणी साचले आणि सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा न झाल्याने पाणी वाहून जाण्याऐवजी ते सखल भागात गेले. त्यामुळेच सोमवारी सराफ बाजार परिसरात दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. यावर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

2008 साली सुद्धा अशी परिस्थिती या भागात निर्माण झाली होती. अलीकडच्या काळात या भागात पावसामुळे नियमितपणे पाणी साठताना दिसत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून, महापालिकेच्या सन्मवयातून तज्ञ अभियंते यांच्या सल्ल्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने पालकमंत्री मंत्री भुजबळ यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा... J&K : शोपियानमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार, गेल्या १७ दिवसात २७ जणांचा खात्मा

लॉकडाऊनमध्ये शिथिलता परंतु कोरोना संपलेला नाही... भुजबळ

नाशिक शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यावर प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी स्वत: जागरुक राहून काळजी घ्यावी. स्वत:च्या आरोग्याची सुरक्षा ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता केल्यामुळे शहरात बाजारपेठेच्या ठिकाणी गर्दी वाढत आहे. परंतु, कोरोना अजुन संपलेला नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे. अगदी गरज असेल तरच बाहेर पडावे. विनाकारण घराबाहेर फिरणे, गर्दी करणे टाळावे. प्रत्येकाने मास्क आणि सॅनिटायझर यांचा वापर कटाक्षाने करावा. तसेच पोलीस यंत्रणेने सुद्धा मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी' अशा सुचना यावेळी भुजबळ यांनी दिल्या.

रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जरी असली, तरिही एका ठराविक संख्येपर्यंत हा वाढता आलेख आपोआपच खाली येईल' असा आशावादही यावेळी भुजबळांनी व्यक्त केला. आज नाशिक शहर पाहणी दौऱ्यावेळी भुजबळ यांच्यासोबत महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, मनपा विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सुर्यवंशी, स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी प्रकाश थविल, पोलीस निरिक्षक हेमंत सोमवंशी, नगरसेवक गजानन शेलार, रंजन ठाकरे आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.