ETV Bharat / city

'वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्नातकांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यावी' - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ दीक्षांत सोहळा नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून पदवी घेतलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्नातकांनी राष्ट्राप्रती समर्पण भावनेने काम करत ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

governor
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
author img

By

Published : Jan 22, 2020, 2:21 PM IST

नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून पदवी घेतलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्नातकांनी राष्ट्राप्रती समर्पण भावनेने काम करत ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एकोणिसाव्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, पालकमंत्री छगन भुजबळ, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्र-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, डॉ. तात्याराव लहाने, आयुषचे संचालक कुलदीप राज कोहली, कुलसचिव डॉ. के.डी. चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक आदी उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

२०१८ - १९ मध्ये घेतलेल्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या आणि अंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या एकूण ११ हजार ४०९ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. या समारंभात ६२ गुणवंतांना सुवर्णपदक आणि १४ विद्यार्थ्यांना पीएच डी. पदवी प्रदान करण्यात आली.

हेही वाचा - स्तुत्य उपक्रम : नाशकात भुकेल्यांना दिले जाते मोफत अन्न, 'असा' आहे उपक्रम

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, आपल्याला समाजाने सर्व काही दिले आहे. समाजामुळे अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळतात. त्यामुळे समाजसेवेला प्राधान्य देऊन सेवाभावनेने कार्य केल्यास वैद्यकीय क्षेत्रातील खरे समाधान विद्यार्थ्यांना मिळवता येईल.

भारतीय प्राचीन पंरपरेने आयुर्वेदासारखी मोठी देणगी आपल्याला दिली आहे. त्या काळात माणसांच्या आजाराचा विचार करून आयुर्वेदाची मांडणी झाली. अशा पारंपरिक ज्ञानाला पुनरुज्जिवीत करण्याचे प्रयत्न व्हावेत, त्याचबरोबर आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन ठेऊन वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान मिळवण्याचा स्नातकांनी प्रयत्न करावा, व्यापक ज्ञान प्राप्त रुग्णसेवेच्या क्षेत्रात आदर्श कार्य घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वैद्यकीय क्षेत्र नोकरीसाठी नसून देशाचा आणि जगाचा गौरव वाढवण्यासाठी आहे, असेदेखील राज्यपाल म्हणाले.

हेही वाचा - गोरगरिबांशी संबंधित विषयावर चर्चा होत नाही - छगन भुजबळ

पालकमंत्री भुजबळ म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील पदवी विद्यार्थ्यांचे आणि समाजाचे जीवन बदलवून टाकणारी असते. या पदवीच्या माध्यमातून डॉक्टर म्हणून गोरगरिबांची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. त्यादृष्टीने पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी समाजसेवेसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा आणि आपल्या कार्याने विद्यापीठाचे नाव देशपातळीवर पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा करावी. नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठ असताना वैद्यकीय महाविद्यालय आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रम सुरू व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा होत असल्याबद्दल त्यांनी विद्यापीठ व्यवस्थापनाचे कौतूक केले. तसेच सुवर्णपदक विजेत्या स्नातकांमध्ये विद्यार्थींनीची संख्या अधिक असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Intro:महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून पदवी घेतलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्नातकांनी राष्ट्राप्रती समर्पण भावनेने काम करीत ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या एकोणिसाव्या दीक्षांत समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विद्यापिठाचे प्र-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमि़त देशमुख, पालकमंत्री छगन भुजबळ, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, डॉ. तात्याराव लहाने, आयुषचे संचालक कुलदीप राज कोहली, कुलसचिव डॉ. के.डी. चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा १९ वा दीक्षांत सोहळा राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडलाय. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. २०१८ - १९ मध्ये घेतलेल्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या आणि अंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या एकूण ११ हजार ४०९ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. या समारंभात ६२ गुणवंतांना सुवर्ण पदक आणि १४ विद्यार्थ्यांना पीएच डी. पदवी प्रदान करण्यात आली.
Body:श्री. कोश्यारी म्हणाले, आपल्याला समाजाने सर्व काही दिले आहे. समाजामुळे अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळातात. त्यामुळे समाजसेवेला प्राधान्य देऊन सेवाभावनेने कार्य केल्यास वैद्यकीय क्षेत्रातील खरे समाधान विद्यार्थ्यांना मिळविता येईल.
भारतीय प्राचीन पंरपरेने आयुर्वेदासारखी मोठी देणगी आपल्याला दिली आहे. त्या काळात माणसांच्या आजाराचा विचार करुन आयुर्वेदाची मांडणी झाली. अशा पारंपारिक ज्ञानाला पुनरुज्जिवीत करण्याचे प्रयत्न व्हावेत, त्याचबरोबर आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन ठेऊन वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान मिळविण्याचा स्नातकांनी प्रयत्न करावा, व्यापक ज्ञान प्राप्त रुग्णसेवेच्या क्षेत्रात आदर्श कार्य घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वैद्यकीय क्षेत्र नोकरीसाठी नसून देशाचा आणि जगाचा गौरव वाढविण्यासाठी आहे, असेदेखील राज्यपाल म्हणाले.

बाईट :- आनलाईन...राज्यपाल Conclusion:.भुजबळ म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील पदवी विद्यार्थ्यांचे आणि समाजाचे जीवन बदलवून टाकणारी असते. या पदवीच्या माध्यमातून डॉक्टर म्हणून गोरगरीबांची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. त्यादृष्टीने पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी समाजसेवेसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा आणि आपल्या कार्याने विद्यापीठाचे नाव देशपातळीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठ असतांना वैद्यकीय महाविद्यालय आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रम सुरु व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विद्यापीठाच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा होत असल्याबद्दल त्यांनी विद्यापीठ व्यवस्थापनाचे कौतुक केले. तसेच सुवर्ण पदक विजेत्या स्नातकांमध्ये विद्यार्थींनीची संख्या अधिक असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.