येवला ( नाशिक ) - गोळीबारात अफगाणिस्तान येथील विदेशी नागरिकाची हत्या घडल्याची घटना येवला तालुक्यातील चिचोंडी येथील एमआयडीसीमध्ये घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. यात सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती असे मृत अफगाणिस्तान येथील ( foreign citizen murder ) या विदेशी नागरिकाचे नाव आहे.
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात मंगळवारी चार अज्ञातांनी अफगाणिस्तानमधील एका ३५ वर्षीय मुस्लिम धर्मगुरुची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही हत्या सुफी यांच्या ड्रायव्हरने केल्याचे निष्पन्न झाला आहे, प्रॉपर्टी आणि पैशावरून सुफी चिस्ती याचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुंबईपासून 200 किमी अंतरावर असलेल्या येवला शहरातील एमआयडीसी परिसरातील एका मोकळ्या भूखंडावर सायंकाळी ही घटना घडली.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती असे अफगाणिस्तान येथील या विदेशी नागरिकांचे नाव आहे. येवल्यात सुफी बाबा म्हणून ते ओळखले जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी सुफी बाबाची त्यांच्या डोक्यात गोळी घालून हत्या केली. त्यानंतर वाहनातून घटनास्थळावरून पळ काढला. पोलिस गुन्हा दाखल करून सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
या घटनेची माहिती नागरिकांना मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान माथुरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सूफी ख्वाजा सैय्यद जरीफ चिश्ती यांना येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आणले गेले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट जरी असेल मात्र हा गोळीबार धार्मिक कार्यातून घडला असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार उशिरा रात्री गुन्हा दाखल झाला असून तिघांविरुद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहे.