नाशिक - सिडको परिसरातील पाटील नगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेने आत्महत्या केली होती. या प्रकरणी पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा सचिन अहिरे (वय 24 वर्षे, रा. पाटील नगर, सिडको) या विवाहित महिलेने गुरुवारी (दि. 25 जून) राहत्या घरी स्वयंपाकगृहातील पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
मरण कोणाला आवडतं? पण, मला आता जगायचं नाही. खूप जगले मी. आता नको वाटतं. कोरोनामुळे एक गोष्ट समजली, माणसं कशी असतात, अशी चिठ्ठी लिहून वर्षाने नाशिकमध्ये आत्महत्या केली. या घटनेने आणि चिट्ठी बघून साऱ्यांनाच धक्का बसला. या चिठ्ठीचे वाचन तिच्या बहिणीने नातलगांच्या समोर केल्याने उपस्थित आप्तस्वकीयांना अश्रू अनावर झाले होते.
सिडको येथील पाटीलनगरमधील विवाहित वर्षा सचिन अहिरे हिने राहत्या घरी पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सिडको येथील पाटीलनगरमध्ये ही घटना घडली होती. पंख्याला लटकलेल्या अवस्थेतून तिच्या घरच्यांनी तिला बेशुद्धावस्थेत एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्रिमूर्ती चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. याप्रकरणी वर्षाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन वर्षाचे पती, सासरे, नणंद यांसह एकुण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षाच्या सासरच्या मंडळींनी वर्षाला व्यवस्थीत स्वयंपाक बनवता येत नाही म्हणून छळत होते. तसेच घर बांधण्यासाठी माहेरुन पैसे आणण्यासाठी वर्षाकडे तगादा लावला होता. या सर्व त्रासाला कंटाळून वर्षाने आत्महत्या केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा - पुन्हा लाॅकडाऊन अशक्य आणि पाहिजे असेल तर मोदींना सांगा : भुजबळ