ETV Bharat / city

आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पंचवटी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल - nashik news in marathi

कुणाल गायकवाड या तरुणाने आत्महत्या करत सुसाइड नोटमध्ये पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सततच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

panchavati police station
panchavati police station
author img

By

Published : Mar 3, 2021, 6:18 PM IST

Updated : Mar 3, 2021, 6:32 PM IST

नाशिक - पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून भद्रकाली परिसरात एका तरुणाने आत्महत्या केल्या असल्याचा अरोप झालेला असतानाच आज असाच एक पुनरावृत्ती करणारा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यातदेखील दाखल झाला आहे. कुणाल गायकवाड या तरुणाने आत्महत्या करत सुसाइड नोटमध्ये पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सततच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

सुसाइड नोटमध्ये पोलीस कॉन्स्टेबलच्या नावाचा होता उल्लेख

गेल्या 18 फेब्रुवारीला नाशिकच्या पंचवटी परिसरात राहणाऱ्या कुणाल गायकवाड या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दरम्यान यात कुणाल याने आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहून ठेवत आपण पंचवटी पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी आणि आपल्या सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान मृत कुणाल गायकवाड यांच्या भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार या कॉन्स्टेबलवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी पोलीस मात्र नातेवाईकांच्या आरोपावरून या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. नातेवाईकांच्या आरोपावरून सत्यता आढळते का? याबाबत ही अधिक तपास पोलिसांचा सुरू आहे.

गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव

गुन्हा दाखल करण्यात आलेला पोलीस कर्मचारी हा मयत कुणाल गायकवाड यांचा साडू असून त्याने काही दिवसांपासून कुणाल गायकवाड याला दमदाटी करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कुणालच्या नातेवाईकांनी केला आहे तसेच आपल्यावर गुन्हा मागे घेण्यासाठी दबावदेखील आणला जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, मंगळवारी नाशिकच्या परिसरातील भीमनगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल करून आत्महत्या केली होती. यामुळे आता याप्रकरणात शहराचे पोलीस आयुक्त काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Mar 3, 2021, 6:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.