ETV Bharat / city

Cold Impact on Grapes : कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षांचा गोडवा होणार कमी; शेतकऱ्यांना भीती

author img

By

Published : Jan 27, 2022, 8:16 PM IST

द्राक्षाचे माहेरघर म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जातो. येथील द्राक्षाला बिहार, दिल्ली, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश या ठिकाणीच्या बाजारपेठेत मोठी मागणी असते. मात्र, यंदा कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षाच्या प्रतवारीवर परिणाम होऊ लागल्याचे ( cold impact on quality of grapes ) शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे ( Temperature in Nashik in Jan 2022 ) द्राक्षात साखर उतरण्यास परिणाम होत आहे. द्राक्षाचा गोडवा कमी होऊन याचा परिणाम मागणीवर होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

द्राक्षांचा गोडवा होणार कमी
द्राक्षांचा गोडवा होणार कमी

नाशिक- कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षात साखर उतरण्यास परिणाम ( Cold Impact on Grapes ) होत आहे. द्राक्षाचा गोडवा कमी झाल्यास ( sweetness of the grapes ) देशातर्गंत बाजारपेठेत द्राक्षाची मागणीत घट होऊ ( Extreme cold impact grapes ) शकते, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

द्राक्षाचे माहेरघर म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जातो. येथील द्राक्षाला बिहार, दिल्ली, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश या ठिकाणीच्या बाजारपेठेत मोठी मागणी असते. मात्र, यंदा कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षाच्या प्रतवारीवर परिणाम होऊ लागल्याचे ( cold impact on quality of grapes ) शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षात साखर उतरण्यास परिणाम होत आहे. द्राक्षाचा गोडवा कमी होऊन याचा परिणाम मागणीवर होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

हेही वाचा-Maha Govt Wine Sale Permission : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन

द्राक्ष उत्पादकांची धावपळ
डिसेंबर महिन्यापासून बिघडलेल्या निसर्ग चक्रामुळे द्राक्ष उत्पादकांची झोप उडाली आहे. सातत्याने तापमानाचा पारा खाली येत असल्याने द्राक्ष उत्पादकांची पहाटेपासूनच धावपळ सुरू होते. सकाळी द्राक्ष बागेला पाणी देणे, बागेत शेकोटी पेटवणे, औषध फवारणी आदी उपाययोजना केल्या जात आहेत. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून निफाड, नाशिक तालुक्यामध्ये किमान तापमान 10 ते 8 अंशापर्यंत खाली येत राहिल्याने द्राक्षांच्या साखर निर्मितीवर परिणाम झाला ( Temperature in Nashik in Jan 2022 ) आहे. त्यामुळे द्राक्ष हंगाम लांबला जाण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. द्राक्षाच्या गोडव्यावर परिणाम झाल्यास बाजारपेठेमध्ये मागणी घट होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या घटली, १३८४ नव्या रुग्णांची नोंद, १२ जणांचा मृत्यू

सूर्यप्रकाशाची गरज
थंडीच्या वातावरणात द्राक्ष पिकाला सूर्यप्रकाशाची गरज आहे. या महिन्यात केवळ तीन दिवस वातावरण चांगले राहिले आहे. दिवसभर वातावरण ढगाळ राहिल्याने द्राक्ष बागांवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तापमानाचा पारा घसरल्याने द्राक्ष मण्यांना तडे जाऊन नुकसान होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तसेच मिलीग आणि भुरी रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.