ETV Bharat / city

नाशिक आदिवासी विभागातील कार्यकारी अभियंतास 28 लाख लाखांची लाच घेताना अटक - नाशिक आदिवासी विभाग कार्यकारी अभियंता

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अटक झालेले आदिवासी विकास विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांची शहरात तसेच जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याची प्राथमिक माहिती आहे यात जनीम,आलिशान घर,जमीन,फ्लॅट,प्लॉट,गाड्या अशी संपत्ती असल्याची चर्चा आहे.

executive engineer of nashik tribal division arrested for accepting bribe of 28 Lakhs
आदिवासी विभाग
author img

By

Published : Aug 28, 2022, 4:18 PM IST

नाशिक आदिवासी विभागाच्या कार्यकारी अभियंताला कंत्राटाच्या बदल्यात तब्बल 28 लाख 80 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. या घटनेमुळे आदिवासी विभागात खळबळ उडाली.

28 लाख 80 हजार रुपयाची लाच मागितली आदिवासी विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांनी कंत्राटदाराकडे अडीच कोटी रुपयांच्या सेंट्रल किचन कंत्राट बाबत तब्बल 28 लाख 80 हजार रुपयाची लाच मागितली होती. याबाबत कंत्राटदाराने नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. कंत्राटदाराने 28 लाख 80 हजार रुपयाची लाच देण्यासाठी बागुल यांनी तिडके कॉलनीतील एका इमारतीच्या फ्लॅट मध्ये बोलवले. त्या ठिकाणी सापळा रचून लाच लुचपत विभागाच्या पथकाने बागुल यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.या घटनेमुळे अदिवासी विभागात खळबळ उडाली आहे. दोन दिवसापूर्वीच नाशिकच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली होती.

अधिकाऱ्यांची कोट्यवधींची संपत्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अटक झालेले आदिवासी विकास विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांची शहरात तसेच जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याची प्राथमिक माहिती आहे यात जनीम,आलिशान घर,जमीन,फ्लॅट,प्लॉट,गाड्या अशी संपत्ती असल्याची चर्चा आहे.

भागीदार कोण? अडीच कोटींच्या कंत्राट कामाच्या रकमेच्या तब्बल 12 टक्के म्हणजेच 28 लाख 80 हजार रुपयांची मोठी रक्कम आहे. या प्रकरणात कार्यकारी अभियंता बागुल यांना अटक झाली असली तरी या रक्कमेत अजून कोणी भागीदार आहे का याबाबत ही चौकशी होणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.