ETV Bharat / city

ST Employees Strike : संपाबाबत प्रशासनाकडून खोटी माहिती पसरवल्या जात असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप - नाशिक ताज्या बातम्या

राज्यातील एसटी कर्मचारी कामावर परतत असल्याचे चित्र तयार केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र प्रशासनाच्या पातळीवर हा संप मोडीत काढून शासनाला खोटी माहिती पुरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नाशिकच्या एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

ST Employees Strike
ST Employees Strike
author img

By

Published : Nov 19, 2021, 7:34 AM IST

Updated : Nov 19, 2021, 10:57 AM IST

नाशिक - राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून राज्यभरात सुरू असलेला कामगार कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी आता एसटी महामंडळ सरसावला आहे. राज्यातील एसटी कर्मचारी कामावर परतत असल्याचे चित्र तयार केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र प्रशासनाच्या पातळीवर हा संप मोडीत काढून शासनाला खोटी माहिती पुरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नाशिकच्या एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. नाशिक विभागातून कोणताही कर्मचारी कामावर परतले नसतानादेखील अधिकारी खोटी माहिती शासनाला देत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

प्रतिक्रिया

२२९६ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस -

दरम्यान, दोन हजारांवर कर्मचाऱ्यांना निलंबित करूनदेखील संपकऱ्याची एकजूट कायम असल्याने आता राज्यभरातील रोजंदारी कर्मचारी कामगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या एकूण २५९४ कंत्राटी कर्मचाऱ्यांना पैकी २२९६ कर्मचाऱ्यांना महामंडळाने सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. या कामगारांनी २४ तासात कामावर हजर व्हावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्‍त करण्‍यात येतील, असे बुधवारी काढलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

संपामुळे दररोज १३ कोटीचा महसुलावर पाणी -

कोरोनामुळे एसटी महामंडळाचे अगोदरच कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. संपामुळे प्रत्येक दिवशी तब्बल १३ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच एसटी महामंडळाचा संचित तोटाही साडेबारा हजार कोटीचा घरात गेला आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेल्याने सरासरी १०० कोटी रुपयांचा फटका एसटी महामंडळाला बसला. एसटी महामंडळाला संपामुळे दररोज सरासरी १३ कोटी रुपयांचा महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्तएसटी महामंडळाला दर वर्षी प्रवासी उत्पन्न व इतर उत्पन्नाचे स्त्रोत धरून फक्त 7 हजार 800 कोटी इतके उत्पन्न मिळते. तर एसटी महमंडळाच्या 1 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनावर वर्षाला 3 हजार 500 कोटी रुपये खर्च होतो. तर साधारणतः इंधनावर 3 हजार कोटी आणि स्पेअर पार्ट आणि टायरला साधारण 600 कोटी इतका खर्च येतो. गेल्या काही वर्षांपासून एसटीच्या प्रवासी संख्येत घट होत असल्याने एसटीचा संचित तोटा वाढत आहे. एसटी महामंडळाचा संचित तोटा हा 2014 -15 आर्थिक वर्षात 1 हजार 685 कोटी रुपये होता. 2018-19 आर्थिक वर्षांत 4 हजार 549 कोटींवर पोहोचला होता. 2020-21 या आर्थिक वर्षांत कोरोनामुळे हा तोटा १२ हजार कोटींच्या घरात जाऊन पोहोचला आहे.

हेही वाचा - गोपीचंद पडळकर यांसह तानाजी पाटील यांना कोणत्याही क्षणी होणार अटक!

Last Updated : Nov 19, 2021, 10:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.