ETV Bharat / city

दिलीप कुमार यांचे नाशिकशी होते ऋणानुबंध!

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे वार्धक्याशी संबंधित त्रासामुळे रुग्णालयात निधन झाले. अभिनयाचा बादशाह असलेल्या दिलीप साब यांची एक खास लकब आणि अभिनय शैली होती.

author img

By

Published : Jul 7, 2021, 3:24 PM IST

Updated : Jul 7, 2021, 4:46 PM IST

dilip kumar
दिलीप कुमार यांचे नाशिकशी नाते

नाशिक - प्रख्यात अभिनेते दिलीप कुमार यांचे नाशिकच्या देवळाली कॅम्पशी ऋणानुबंध राहिले आहेत. त्यांचे या भागात लहानपण गेले आहे. तसेच आईसह कुटुंबाचे दफनविधी येथे झालेला असल्याने अनेक वर्षे ते आईच्या कबरीवर चादर चढवायला येत. तसेच त्यांच्या चित्रपटाचे देखील चित्रीकरण नाशिकला झाल्याने त्यांचे नाशिकशी जवळीक होती.

प्रतिक्रिया देताना हाजी मोहमद रफिक

हेही वाचा - मधुबालावर प्रेम, पण २२ वर्षांनी लहान सायरा बानोंशी निकाह, अशी आहे LOVE STORY

  • भावनिक आठवणी -

दिलीप कुमार यांचे लहानपण देवळाली कॅम्प येथे गेले आहे. त्यांचे कुटुंब देवळाली कॅम्पला राहायला होते. देवळाली कॅम्पला त्यांच्या कुटुंबाचे घर, जमीन असल्याने अनेक वर्षापासून त्यांचे नातेवाईक येथे स्थायिक आहेत. सध्या दिलीप कुमार यांचे पुतणे जावेद नूर महोमद खान देवळाली कॅम्पला राहतात. स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९४२ ला दिलीप कुमार यांच्या मातोश्री आयेशा सरवर खान यांना प्रकृती अस्वस्थामुळे हवा बदलासाठी देवळाली कॅम्पला फातिमा सॅनोटरीत आणले गेले. दिलीप कुमार यांचे वडील गुलाम सरवर खान हे तोफखाना केंद्रातील लष्कराला फळपुरवठा करायचे. त्यामुळे दिलीप कुमार यांचे बालपणीचे शिक्षण देवळाली कॅम्पला मुसा कॉटेज येथेच झाले. देवळाली कॅम्पला असताना दिलीप कुमार यांच्या मातोश्री आयेशा खान यांचे निधन झाले. अनेक वर्षे ते आपल्या आईच्या कबरीवर चादर चढवण्यासाठी नाशिकला येत होते.

  • चित्रीकरणाच्या आठवणी -

दिलीप कुमार यांच्या गंगा जमना या चित्रपटाचे चित्रीकरण नांदूर वैद्य येथील रोकडोबा गाव परिसरात झाले. १९५६ ते १९६० जवळपास तीन वर्ष पूर्ण गंगा जमना चित्रपटाचे चित्रीकरण या भागात सुरू होते. १९६१ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट खूप गाजला होता. नितीन बोस दिग्दर्शक असलेल्या चित्रपटात मुख्य नायक दिलीप कुमार, नासीर खान, वैजयंती यांनी भूमिका साकारली होती.

  • कबरस्थानसाठी दिला होता निधी -

दिलीप कुमार यांचे लहानपण देवळाली भागात गेले. या ठिकाणी असलेल्या कबरस्थानमध्ये त्यांच्या आईचा आणि कुटुंबातील काही सदस्यांचा दफनविधी झाला होता. दिलीप कुमार मुंबईला असताना देखील ते वेळातवेळ काढून देवळाली कॅम्प येथील आईच्या कबरवर चादर चढवण्यात येत होते. दिलीप कुमार जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांनी त्यांच्या निधीतून कबरस्थान येथील रस्ते बनवण्यासाठी 20 लाखांचा निधी दिला होता. त्यांच्या अनेक आठवणी देवळाली कॅम्पशी जुडल्या आहेत, असे देवळाली कॅम्प कबरस्थान येथील ट्रस्टी हाजी मोहमद रफिक यांनी सांगितले आहे.

  • ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन -

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे वार्धक्याशी संबंधित त्रासामुळे रुग्णालयात निधन झाले. अभिनयाचा बादशाह असलेल्या दिलीप साब यांची एक खास लकब आणि अभिनय शैली होती. भारतात स्टारडम रुजवणाऱ्यांपैकी ते प्रथम होते. खऱ्या अर्थाने भारताचा पहिला सुपरस्टार म्हणून त्यांची ओळख होती. आज त्यांच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - दिलीप कुमारः बॉलिवूडचा पहिला 'कोहिनूर' सुपरस्टार काळाच्या पडद्याआड

Last Updated : Jul 7, 2021, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.