ETV Bharat / city

Palakhed Dam Water : नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात वाढ; पालखेड धरणातून 15 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग

नाशिक जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने दडी ( Nashik rain update ) मारली होती. अखेर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने धुवाधार बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 12 तासांत नाशिकसह परिसरात 57 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज सकाळी 6 वाजता पालखेड धरणातून विसर्ग वाढवून 8 हजार 370 क्युसेक्स करण्यात आला.

नाशिक धरणसाठा
नाशिक धरणसाठा
author img

By

Published : Jul 11, 2022, 9:30 AM IST

नाशिक- जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू ( continuous rains in Nashik ) आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील ( water storage in Nashik dams ) पाणी साठ्यात वाढ होत आहे. पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पाण्याची पातळी वाढली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून पालखेड धरणातून 15 हजार 408 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात ( ​​Palakhed Dam water release ) सुरू आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात येईल असे, जिल्हा प्रशासनाने सांगितलं आहे.

आज सकाळी 6 वाजता पालखेड धरणातून विसर्ग ( discharge from Palakhed dam ) वाढवून 8 हजार 370 क्युसेक्स करण्यात आला. यानंतर सात वाजता विसर्गात सात हजार क्यूसेक्सची वाढ करून विसर्ग 15 हजार 408 क्यूसेक्स इतका ( Nashik dam water update ) करण्यात आला आहे.

पावसाचा जोर कायम- नाशिक जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. अखेर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने धुवाधार बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 12 तासांत नाशिकसह परिसरात 57 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर (दि १०) रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान 7.7 मिलिमीटर पाऊस झाला. यानंतर रात्री साडेदहा ते साडेअकरा दरम्यान 6.4 मिलिमीटर पाऊस झाला. तर रात्री साडेअकरा ते पहाटे 35.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

गंगापूर धरणातून पाणी सोडणार- गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत झाली आहे. पावसाचा जोर टिकून असल्याने आज दुपारी 2 वा गंगापूर धरणातून 1 हजार क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पावसाचा जोर सतत राहिल्यास टप्याटप्याने विसर्ग वाढण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा-Weather Update: राज्यात पावसाशी संबंधित घटनांत 76 जणांचा मृत्यू

हेही वाचा-Mumbai Rain : पावसाचे वाया जाणारे पाणी वाचवण्यासाठी पालिकेकडे उपाययोजना नाही

हेही वाचा-IMD alert in Chandrapur : चंद्रपुरात पुढील दोन-तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.