ETV Bharat / city

दिंडोरीत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी नगरसेवकानी पाठवली १ हजार पत्रे - दिंडोरी शहर नगरसेवकाने स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी नागरिकांना पत्र पाठविली

दिंडोरी शहरातील नगरसेवक तुषार वाघमारे यांनी स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक वापर टाळण्याबाबत शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांना व इतर क्षेत्रातील व्यावसायिकांना तब्बल 1 हजार हाताने लिहिलेली पत्रे पाठवली आहेत.

Councilor Tushar Waghmare of Dindori City
दिंडोरी शहरातील नगरसेवक तुषार वाघमारे
author img

By

Published : Dec 14, 2019, 11:31 PM IST

नाशिक - दिंडोरी शहरातील नगरसेवक तुषार वाघमारे यांनी स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांना व इतर क्षेत्रातील व्यावसायिकांना तब्बल 1 हजार हाताने लिहिलेली पत्रे पाठवली आहेत. या पत्रांद्वारे दिंडोरी शहराच्या स्वच्छता आणि जनजागृतीसाठी त्यांना एक उल्लेखनीय व अभिनव उपक्रम राबवला आहे.

दिंडोरी नगरपंचायतीच्या नगरसेवकाचा अभिनव उपक्रम, स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी नागरिकांना पाठवली एक हजार पत्रे

हेही वाचा... भाजप नेते संबित पात्रांनी राहुल गांधींचं ठेवलं नवं नाव, म्हणाले...

तुषार वाघमारे हे सातत्याने अनेक समाजोपयोगी कामे करत असतात. वाघमारे यांनी नगरसेवक झाल्यापासून घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता या विषयांवर लक्ष देत अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. वाघमारे यांनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा पत्रे पाठवण्यासाठी खर्च न करता पोस्ट ऑफिसच्या पोस्टकार्ड सुविधेचा वापर घनकचरा व्यवस्थापनाचा प्रबोधनात्मक सामाजिक संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी केला. त्यांनी तब्बल १ हजार हाताने लिहिलेली पत्रे लिहून नागरिकांना पाठवली आहेत. ही पत्र लिहिण्यासाठी त्यांना जवळपास ६ महिन्यांचा कालावधी लागला. सध्याच्या युगात घरी पत्र येतान दिसत नाहीत. मात्र, नगरसेवकाने पाठवलेले पत्र वाचताना नागरिकांच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होत आहे.

Letter from Councilor Tushar Waghmare
नगरसेवक तुषार वाघमारे यांनी पाठवलेले पत्र

हेही वाचा... दूध महागले! मदर डेअरीकडून प्रति लिटर ३ रुपयांची दरवाढ

वाघमारे यांनी हे पत्र पाठवल्यानंतर सर्वत्र या पत्राची चर्चा सुरू झाली आहे. यानंतर घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता तसेच प्लास्टिकचा वापर टाळणे, हे विषय गांभीर्याने नागरिकांमध्ये चर्चिले जात आहेत. जो परिणाम साध्य करण्यासाठी तुषार वाघमारे यांनी एवढे परिश्रम घेतले, त्याच्या प्राथमिक स्वरुपात त्यांना फळ मिळताना दिसत आहे. दिंडोरी शहरात सर्वत्र तुषार वाघमारे यांच्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या कार्याचे कौतुकही होत आहे.

हेही वाचा... शिक्षेच्या अंमलबजावणी प्रक्रियेला वेग; निर्भयाचे गुन्हेगार तणावाखाली, खाणे-पिणे झाले कमी - सूत्र

Intro:नाशिक -दिंडोरी नगरपंचायत चे नगरसेवक तुषार वाघमारे यांचा जनजागृती साठी अभिनव उपक्रम...!!

नेहमीच सामाजिक कार्यासाठी चर्चेत रहाणारे दिंडोरी शहरातील युवा नगरसेवक *तुषार वाघमारे* यांनी स्वच्छता , घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक वापर टाळण्या बाबत दिंडोरी शहरातील प्रभाग क्रमांक ११मधील नागरिकांना व इतर क्षेत्रातील व्यावसायिकांना तब्बल १००० हस्तलिखित पत्र(पोस्ट कार्ड) वैयक्तिक पातळीवर पाठवून एक उल्लेखनीय व अभिनव सामाजिक उपक्रम राबविला आहे.
अनेक समाजोपयोगी कामे करत असतांना तुषार वाघमारे यांनी नगरसेवक झाल्यापासून घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता ह्या विषयांवर लक्ष देऊन अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत.... अगदी सामान्य पणे सदैव विकासाची आस घेऊन कार्यरत असलेल्या या तरुण नगरसेवकाने नवीन वर्षाच्या पार्श्र्वभूमीवर शुभेच्छापत्रे पाठविण्यासाठी खर्च न करता, पोस्ट आॅफिसच्या पोस्टकार्ड सुविधेचा प्रभावी वापर घनकचरा व्यवस्थापनाचा प्रबोधनात्मक सामाजिक संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी केला. त्यांनी तब्बल १००० (एक हजार) हस्तलिखित पत्र लिहून नागरिकांना पाठविले. ही पत्र लिहीण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी त्यांना लागला.Body:सध्याच्या युगात घरी पत्र येण्याचे दिवस आता संपलेत. परंतु नगरसेवकाने पाठवलेले पत्र वाचतांना एक वेगळीच भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली.
विषय सरळ काळजालाच भिडला...
सर्वत्र या पत्रांची चर्चा सुरू झाली... आणि घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता तसेच प्लास्टिकचा वापर टाळणे हे विषय गांभीर्याने नागरिकांमध्ये चर्चिले जाऊ लागलेत. जो परिणाम साध्य करण्यासाठी तुषार वाघमारे यांनी येवढे परिश्रम घेतले तो मिळतांना दिसतोय.
दिंडोरी शहरात सर्वत्र तुषार वाघमारे यांच्या ह्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे व त्यांच्या कार्याचे कौतुकही होत आहे.Conclusion:पत्राचा आशय :-

माननीय महोदय,
पत्र लिहिण्यास कारण की, मला एका दुर्धर आजाराने ग्रासले आहे आणि त्यातून फक्त आपणच माझी सुटका करु शकतात. मला कर्करोग झालाय. हो अस्वच्छतेचा कर्करोग...! आपल्याकडे मी मोठ्या अपेक्षेने पहात आहे. सांडपाणी,कचरा,प्लास्टिक व इतर अस्वच्छतेने माझा श्वास गुदमरतोय..!

मला हवी आहे आपली मदत..! त्यासाठी स्वच्छतेची सवय स्वत: सोबतच इतरांना ही लावण्यासाठी मला मदत करा. ओला व सुका कचरा यांचे वर्गिकरण करुन तो वेगवेगळा साठवा व येणाऱ्या नगरपंचायतीच्या घंटागाडीत टाका. प्लास्टिकचा वापर टाळा. ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर करण्यासाठी तो वेगळा साठवा. लक्षात ठेवा घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज आहे.
त्यामुळे माझ्या सोबतच तुम्हा सर्वांचेच आरोग्य चांगले राहील. अन्यथा रोगराई, संसर्गजन्य आजार,डास व अस्वच्छतेच्या विळख्यात माझ्यासोबत आपली येणारी भावी पिढी ही अस्वच्छतेच्या दुर्धर आजाराने ग्रस्त होईल. म्हणून व्यक्तिगत व सार्वजनिक स्वच्छता राखून मला व येणाऱ्या पिढीला देणार ना एक सुंदर व स्वच्छ राहाण्यालायक शहर ...?

आपली *"लाडकी"*
*दिंडोरी*

संकल्पना:- तुषार मधुकर वाघमारे
नगरसेवक, प्रभाग क्र. ११

# स्वच्छ दिंडोरी... सुंदर दिंडोरी...!
# कच-याचे ओला कचरा व सुका कचरा असे वर्गिकरण करा .
# प्लास्टिकचा वापर टाळा.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.