ETV Bharat / city

नाशिक : गोदाकिनारी तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ.. - नाशिक गुन्हे वृत्त

नाशिक शहरातील भद्रकाली परिसरात गोदाकिनारी तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून हा खून करत तरुणीचा मृतदेह फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

decomposed dead body of a young woman
तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ
author img

By

Published : Dec 13, 2020, 4:43 PM IST

Updated : Dec 13, 2020, 4:49 PM IST

नाशिक - शहरातील भद्रकाली परिसरात गोदाकिनारी तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून हा खून करत तरुणीचा मृतदेह फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून भद्रकाली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

खून करून तरुणीचा मृतदेह फेकून दिल्याचा संशय -

भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील गोदाकिनारी नदीच्या तपोवन मैदानातील गवतामध्ये अंदाजे वय वर्षे १७ ते २५ दरम्यानच्या स्त्रीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त दीपाली खन्ना, पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाच्या शरीरावरील कपडेही फाटलेले असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने पोलिसांना ओळख पटविणे अवघड होत आहे. मात्र तरुणीचा खून करून मृतदेह फेकून दिल्याचा पोलिसांनी अदाज व्यक्त केला आहे.

गोदाकिनारी तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ
डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने महिलेचा मृत्यू -शहरातील सर्व पोलीस ठाणे, ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या बेपत्ता महिलांच्या माहितीची चाचपणी पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे. डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्यामुळे अनोळखी महिलेचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Last Updated : Dec 13, 2020, 4:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.