ETV Bharat / city

Petrol Pumps Remain Closed Nashik : नाशिकमध्ये गुढीपाडवाच्या दिवशी सर्व पेट्रोल पंप बंद.. 'असे' आहे कारण..

author img

By

Published : Mar 31, 2022, 3:53 PM IST

पोलीस आयुक्तांनी ( Nashik Police Commissioner Deepak Pandey ) पेट्रोलपंप चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे धोरण अवलंबल्याने नाशिकमधील पेट्रोलपंप चालक आक्रमक झाले आहेत. आयुक्तांच्या या आदेशाचा निषेध म्हणून ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील पेट्रोलपंप बंद ठेवण्यात येणार असल्याचे नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स असोशिएशनने सांगितले ( Petrol Pumps Will Remain Closed Nashik ) आहे.

नाशिकमध्ये गुढीपाडवाच्या दिवशी सर्व पेट्रोल पंप बंद.. 'असे' आहे कारण..

नाशिक : नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे ( Nashik Police Commissioner Deepak Pandey ) यांनी काढलेल्या हेल्मेट सक्तीच्या आदेशाविरोधात नाशिक शहरातील सर्व पेट्रोल पंप 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला ( Petrol Pumps Will Remain Closed Nashik ) आहे. पोलिस आयुक्त दिपक पांडेय यांनी घेतलेल्या 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' विषयाच्या नवीन आदेशाचा निषेध करण्यात आला ( No Helmet No Petrol ) आहे.

पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशनचं असं आहे म्हणणं : दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरले पाहिजे, हाच आमचा आग्रह आहे. तसेच हेल्मेट न वापरल्याने कुणाचाही अपघात व्हावा अशी आमची इच्छा नाही. या सर्व मोहिमेला आमचा सतत पाठिंबा राहिला आहे. पोलीस आयुक्त यांनी देखील 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' या मोहिमेमध्ये सहकार्य केल्याबद्दल वेळोवेळी आमचे कौतुक देखील केलेले आहे. मात्र, पोलिसांनी आता घेतलेली भूमिका आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करणे या दोन गोष्टी अतिशय धक्कादायक आहेत. कारण असा अनुभव आलेला आहे की, पेट्रोल पंपावर हेल्मेट घातलेला मनुष्य हा रस्त्यावरती वाहन चालविताना हेल्मेट काढून ठेवतो. केवळ पेट्रोल पंपावर हेल्मेट सक्ती केल्याने रस्त्यावरती हेल्मेट वापरण्यात खूप वाढ होत नाही. याबाबतीत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यालयाला सुनावणी घेण्यास सांगितले होते. तसा अर्ज उच्च न्यायालयातील वकिलामार्फत असोसिएशनने पोलीस आयुक्त कार्यालयात केलेला आहे. मात्र, पोलीस आयुक्तालय कार्यालयाकडून आजपर्यंत त्यासाठी बोलावले गेलेले नाही. केवळ काही जुन्या अर्जांवरती चार महिन्यांनी एक बैठक घेऊन निकाली काढण्यात आलेले आहेत. मात्र, उच्च न्यायालयातील वकिलांनी दाखल केलेला अर्ज अजून, आयुक्तालयाकडे प्रलंबित आहे, असं मतं नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशनकडून व्यक्त होत आहे.

म्हणून संप पुकारला : नवीन पंपांची वाढलेली संख्या, करोनामुळे अडचणीत आलेले व्यवसाय, डिझेल पेट्रोलचे वाढलेले दर, सीएनजी इलेक्ट्रिक गाड्या, अवैध व बेकायदेशीर बायोडिझलचा सुळसुळाट, यामुळे कमी झालेला व्यवसाय अशा अनेक विविध कारणांमुळे पेट्रोल पंपाचा व्यवसाय मोठ्या आर्थिक अडचणीत आलेला आहे. असे निर्णय कुठल्याही पंप चालकांचे तसेच कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करणारे आहेत. या निर्णयाविरुद्ध आम्ही पालकमंत्र्यांकडे दाद मागणार आहोत. तसेच या निर्णयामुळे पंप चालकांना अतिशय मोठा त्रास होणार असल्यामुळे आम्ही नाशिक शहरातील सर्व पेट्रोल पंप चालक हे दिनांक 02 एप्रिल 2022 रोजी म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पेट्रोल पंप हे एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहोत. संप पुकारून आयुक्त यांनी पेट्रोलपंप चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करण्याच्या धोरणाचा निषेध नोंदवत पेट्रोल पंपाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशन सांगितलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.