नाशिक : लग्न सोहळ्यासाठी हॉल, लॉन्स, पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था होत असतांना, अचानक राज्य सरकारने ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्ण ( Increasing patient of omicron) संख्येमुळे सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अगोदर लग्न सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे वधू-वर कुटुंबाची चांगलीच धावपळ होत आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे 24 डिसेंबरच्या मध्यरात्री पासून महाराष्ट्र सरकारनं नव्याने निर्बंध ( Government of Maharashtra Restrictions )जारी केले आहेत. त्यामध्ये लग्न समारंभ आणि नवीन वर्षाच्या स्वागतामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारने यावर निर्बंध लागू केले आहेत.
लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहामध्ये 100 लोकांच्या उपस्थितीला परवाणगी दिली आहे. तर मोकळ्या जागेत 250 पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती नसावी, असे निर्बंध जारी केले आहेत. त्याचबरोबर इतर ठिकाणी जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के पेक्षा जास्त गर्दी असू नये असे नियम लागू केले आहेत. शासनाचे हे आदेश 24 डिसेंबर शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे दीड ते दोन महिन्यांपासून विवाह समारंभाच्या तयारीला लागल्या कुटुंबांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण निर्बंध जारी करण्या अगोदरच विवाह निमंत्रणं सुद्धा दिली गेली आहेत. अशात नवीन निर्बंधांमुळे वर-वधू कुटुंबांची चांगलीच धावपळ होत आहे.
महत्वाचे मुहूर्त -
26 डिसेंबर पासून सलग चार ते पाच दिवस लग्न मुहूर्त आहेत. या दाट तारखांमुळे अनेकांनी दुपारी तसेच गोरज मुहूर्तावर लग्न आयोजित केले आहे. त्यासाठी लागणाऱ्या हॉटेल, लॉन्स, केटरर्स, बँड पथक आणि सजावट लाखों रुपये मोजले आहेत. तसेच अनेकांना निमंत्रण दिले असल्याने कोरोनाच्या नवीन निर्बंधांमुळे वर वधू कुटुंबांची चांगलीच धावपळ होत आहे.
पाच मंगल कार्यालयावर कारवाई -
सरकारने कोरोना संबंधित नियमावाली जारी करुन देखील काही मंगल कार्यालयाने नियमांचे पालन केलेले नाही. त्यामुळे अशा नियम मोडणाऱ्या पाच मंगल कार्यालय चालकांवर नाशिक महानगरपालिका पथकाने कारवाई ( Action of Nashik Municipal Corporation Squad ) केली आहे. ही कारवाई 26 डिसेंबर रोजी केली आहे. तसेच या कारवाईतून एक लाख तीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Difficulty in marriage Corona new restrictions : कोरोनाच्या नव्या नियमावलीमुळे वधू-वर कुटुंबांची धावपळ
राज्य सरकारने ( Government of Maharashtra )कोरोना महामारी संदर्भात नवीन नियमावली जारी ( Corona new restrictions in Maharashtra ) केली आहे. त्यामुळे आता विवाह करणाऱ्या वधू-वर यांच्या कुटुंबाची चांगलीच धावपळ होत आहे. कारण नियमावली जाहीर होण्याच्या अगोदरच लगीन सराईची बऱ्यापैकी तयारी झाली आहे. म्हणून आता अडचणी निर्माण होत आहेत. काही ठिकाणी मंगल कार्यालय चालकांवर कारवाई सुद्धा झाली आहे.