नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने अद्याप शाळा सुरू करण्याबाबत कुठलाच निर्णय घेतला नाही. मात्र, याचा परिमाण आता शाळेवर अवलंबून असलेल्या शालेय वाहतूकदारांवर होत आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 24 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. लॉकडाऊनमूळे अनेकांना घरी बसावे लागले. सर्वसामान्यांचा रोजगार बुडाला. उद्योगधंदे, कारखाने बंद होते. मात्र, यानंतर अनलॉकमध्ये सरकारने उद्योग व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, शाळा व महाविद्यालयं अद्याप बंद असल्याने शालेय विद्यार्थी वाहतूकदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे हजारो वाहनचालक बेरोजगार झाले आहेत.
हेही वाचा - पालघरात रात्रीतून भूकंपाचे तीन धक्के; डहाणू-तलासरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक जिल्ह्यात 4 हजार 200 वाहनचालक घरी बसले आहेत. मात्र, बँकांकडून वाहन कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे. या वाहतूक चालकांच्या समस्यांकडे शासनाने लक्ष द्यावे यासाठी शिवसेनेच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्यावतीने राज्य सरकारकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
- स्कुल व्हॅन चालकांना बँकांनी कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी
- 6 महिन्यांपासून शाळा बंद असल्याने उपप्रादेशिक विभागाकडून 1 वर्ष फिटनेस मुदत वाढ देण्यात यावी
- बँकांनी दंड व्याज माफ करण्यात यावे.
- खासगी वित्त संस्था, फायनान्स कंपनीकडून करण्यात येणारी वसुली थांबवावी
अशा विविध मागण्यांकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.