ETV Bharat / city

Kumar Shiralkar: हयातभर आदिवासी, शेतमजूरांसाठी लढणारा कॉम्रेड अनंतात विलीन

हयातभर शेतकरी, ऊसतोड मजुरांसाठी लढणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कुमार शिराळकर (Kumar Shiralkar) यांचे रविवारी (दि. 2 ऑक्टोबर)रोजी रात्री नाशिक येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कुमार शिराळकर

author img

By

Published : Oct 4, 2022, 5:57 PM IST

नाशिक - आदिवासी, दलितांसाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते आणि विचारवंत कुमार शिराळकर यांचे रविवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने परिवर्तनवादी चळवळीत शोक व्यक्त करण्यात येत आहे. (Kumar Shiralkar Passed Away) काल (3 ऑक्टोबर)रोजी सायंकाळी चार वाजता शहादा येथील मोडमधील कॉ. बी.टी. रणदिवे हायस्कूल प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडला.गेल्या एक महिन्यापासून त्यांंच्यावर पुणे, मुंबईपाठाेपाठ नाशिक येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

केंद्रीय समितीचे सदस्य - कॉम्रेड शिराळकर काही दिवसांपासून कर्करोगाने आजारी होते. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मूळचे मिरजेचे असणारे शिराळकर यांनी पवई आयआयटीतून सुवर्णपदक मिळवले होते. मार्क्‍सवादाने ते प्रभावित होते. मुंबईत असताना युवक क्रांती दलात त्यांचा सहभाग होता. (Funeral of Comrade Kumar Shiralkar) नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील अंबरसिंह महाराजांच्या संपर्कात येऊन ते माकपशी जोडले गेले. मार्क्‍सवाद केवळ वाचनापुरताच मर्यादित न ठेवता त्यांनी तो कृतीत आणला. २०१४ पर्यंत पक्षाच्या राज्य आणि केंद्रीय समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

विचारवंताची वैचारिक घडण - मार्क्सवादी कार्यकर्ता, संत कम्युनिस्ट, शोषित-वंचित समूहांचा, विशेषतः आदिवासी आणि भूमिहीनांचा आवाज म्हणून कुमार शिराळकर यांना उभा महाराष्ट्र ओळखतो. एक संघर्षशील राजकीय कार्यकर्ता ते होतेच, त्याबरोबर ते कृतिशील विचारवंतही होते. या कृतिशील विचारवंताची वैचारिक घडण झाली ती सत्तरच्या दशकात. सत्तरच्या अस्वस्थ दशकातल्या अनेक परिवर्तनवादी चळवळींमध्ये, प्रयोगांमध्ये कुमार शिराळकर अग्रक्रमाने सहभागी होते.

आदिवासींसाठी लढा - 1970 च्या दशकात आयआयटी मुंबईतून सुवर्णपदक प्राप्त केलेल्या कुमार शिराळकर यांनी नोकरीचा त्याग करून तत्कालीन धुळे जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील आदिवासींवर जमीनदारांकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आयुष्य झोकून दिले. अंबरसिंह महाराज यांच्या नेतृत्वातील लढ्यात ते सहभागी होते. आपल्या अनेक मध्यमवर्गीय, सुशिक्षित साथीदारांना सोबत घेत आदिवासींची श्रमिक संघटना स्थापन केली. त्याचसोबत ते 'मागोवा' या क्रांतिकारी गटाचे सदस्य होते. नंदूरबारमधील आदिवासींच्या लढ्यात त्यांना जमिनदारांच्या हल्ल्यालाही सामोरे जावे लागले होते.

नामांतर चळवळीत सहभाग - या यशस्वी लढ्यानंतर त्यांचे काही सहकारी शहरात परतले. मात्र, शिराळकर नंदूरबारमध्येच स्थायिक झाले. त्यांनी 1982 मध्ये मार्क्सवादी कम्यु्निस्ट पक्षात प्रवेश केला. माकपशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय शेतमजूर युनियनमध्ये सक्रिय होते. या संघटनेचे केंद्रीय राज्य सरचिटणीस आणि नंतर राष्ट्रीय सहसचिव म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. शिराळकर यांनी दलित पँथर चळवळ, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत सहभाग नोंदवला होता. नामांतर चळवळीत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.

लेखक, विचारवंत - शिराळकर हे चळवळीत सक्रिय असले तरी अतिशय कसदार लेखन आणि चिंतन करणारे मार्क्सवादी विचारवंत अशीही त्यांची ओळख होती. मार्क्स, बुद्ध, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक शिदोरीवर त्यांचा बौद्धिक पिंड जोपासला होता. आदिवासींना कसत असलेल्या जमिनीचा अधिकार देणाऱ्या वनाधिकार कायद्याची नियमावली बनवण्यासाठी शिराळकर भारतभर पायपीट करून त्या कायद्याच्या अंमलबजावणीत मोठी कामगिरी केली.

माकपची आदरांजली - आदिवासीपासून नामवंत पुरोगामी विचारवंतांपर्यंत त्यांनी सुह्रदांचे जाळे तयार केले होते. त्यांच्या निधनाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एक लढाऊ, सर्वहारा जाणीव पुरेपूर अंगिकारलेला, दूरगामी दृष्टी असलेला विचारवंत नेता गमावला आहे. त्यांची वैयक्तिक सुखाची तमा न करता त्यागी जीवन जगण्याची प्रेरणा आमच्या कार्यकर्त्यांना कठीण परिस्थितीवर मात करण्याचे बळ देईल, अशा शब्दात माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी त्यांना आदरांजली वाहिली. कुमार शिराळकर हे 2014 पर्यंत माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.