नाशिक : लॅबमध्ये लावलेल्या हनुमान चालिसाचा आवाज कमी करण्यास नकार देणाऱ्या पॅथाेलाॅजी लॅबच्या कर्मचाऱ्यास टाेळक्याने मारहाण केल्याची घटना पाथर्डी फाटा येथे घडली. दरम्यान, या संदर्भात परस्परांत जागेचा वाद असून, हनुमान चालिसेचा या प्रकरणात काही संबंध नसल्याचे इंदिरानगर पाेलिसांनी स्पष्ट केले आहे.
फिर्यादी यांनी दिलेली माहिती : फिर्यादी किशाेर वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते पाथर्डी फाटा येथील राजश्री कॉम्प्लेक्समध्ये लाईफ केअर पॅथॉलॉजी लॅबमध्ये कामाला आहेत. 28 मे रोजी नेहमीप्रमाणे ते लॅबमध्ये हनुमान चालिसा लावून पूजा करीत असताना पाच ते सात संशयित आले. त्यांनी त्यांना मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या संदर्भात पाेलिसांनी संशयित व वाघमारे यांचा जागेवरून वाद असल्याचे सांगून हनुमान चालिसेचा काेणताही वाद नसल्याचे सांगितले आहे. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत.
हेही वाचा : धक्कादायक! पावामध्ये क्रीम नसल्याने गुंडांची मारहाण, बेकरी मालकासह कुटुंब जखमी