ETV Bharat / city

MUHS on Ukraine Return Student : युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या माहिती संकलनास सुरुवात - MUHS on Ukraine Return Student

युद्धग्रस्त युक्रेनमधून परतणाऱ्या वैद्यकीय विद्याशाखेतील विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती संकलित करण्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे ( MUHS on MBBS students ) प्रारंभ करण्यात आला आहे. याचबरोबर नॅशनल मेडिकल कमिशनकडे ( National medical commission ) या विद्यार्थ्यांना राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित करणेबाबत कोणती योजना आहे काय याबाबत विद्यापीठातर्फे विचारणा करण्यात आलेली आहे. याबाबत सुस्पष्टता व निर्देश प्राप्त झाल्यावर योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर ( Vice Chancellor of the MUHS varsity ) यांनी ( Madhuri Kanitkar on Ukraine return student ) सांगितले आहे.

कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल  डॉ. माधुरी कानिटकर

author img

By

Published : Mar 7, 2022, 10:31 PM IST

Updated : Mar 8, 2022, 1:17 PM IST

नाशिक- युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक भारतीय विद्यार्थ्यांना तेथील शिक्षण ( Indian students return from Ukraine ) सोडून परतावे लागले आहे. यामध्ये राज्यातील रहिवाशी असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याचे काम आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ( Maharashtra University of Health Science ) हाती घेतले आहे. MUHS on Ukraine return student

युद्धग्रस्त युक्रेनमधून परतणाऱ्या वैद्यकीय विद्याशाखेतील विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती संकलित करण्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे ( MUHS on MBBS students ) प्रारंभ करण्यात आला आहे. याचबरोबर नॅशनल मेडिकल कमिशनकडे ( National medical commission ) या विद्यार्थ्यांना राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित करणेबाबत कोणती योजना आहे काय याबाबत विद्यापीठातर्फे विचारणा करण्यात आलेली आहे. याबाबत सुस्पष्टता व निर्देश प्राप्त झाल्यावर योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर ( Vice Chancellor of the MUHS varsity ) यांनी ( Madhuri Kanitkar on Ukraine return student ) सांगितले आहे.

युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या माहिती संकलनास सुरुवात

हेही वाचा-Assembly Election Exit Poll : पंजाब मध्ये 'आप'ची सत्ता येण्याची शक्यता? जाणून घ्या अन्य राज्यांची स्थिती

युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण सोडून पुन्हा मायदेशी परतले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी नेमके काय करता येऊ शकते याची माहिती घेण्याबाबत आरोग्य शिक्षणमंत्र्यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सूचना केली होती. यानुसार युक्रेन या देशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या आणि राज्यातील मूळ निवासी असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याबाबत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परिपत्रक काढले आहे.

हेही वाचा-Students Sent Back: युद्धविराम अयशस्वी, सुमी युक्रेनच्या भारतीय विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबले

युक्रेनहून परतणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींमध्ये मदत करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने पुढाकार...
आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात युक्रेनहून परतणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींमध्ये त्यांना कशी मदत करता येईल याबाबतीत महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असे सांगितले होते. यादृष्टीने विद्यापीठातर्फे www.muhs.ac.in या संकेतस्थळावर अर्ज देण्यात आला आहे. या अर्जाव्दारे विद्यार्थ्यांनी योग्य माहिती भरून पाठवायची आहे.

हेही वाचा-ETV Bharat Womens Day Special : दुर्गा-अहिल्या पथकातील रेल्वे महिला वेल्डर; पाहा, महिला दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...

देशांतर्गत आरोग्य शिक्षणाच्या दर्जासाठी कोणतीही मानके कमी केली जाणार नाहीत...
देशातील सर्व वैद्यकीय विद्याशाखांचे प्रवेश ‘नीट’ प्रवेश पद्धतीद्वारे गुणवत्ता आधारित होतात. त्यामुळे युद्धग्रस्त युक्रेनमधील विद्यार्थ्यांना येथील महाविद्यालयात सरळ प्रवेश देता येणे शक्य नाही. विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी विदेशात गेले होते. त्यांची विशिष्ट आकांक्षा लक्षात घेऊन त्यांच्या तेथील शिक्षणाबाबत विश्वासार्ह मूल्यांकन परीक्षा आयोजित करता येणे अशा सर्व बाबींचा विचार करण्यासाठी वस्तुनिष्ठ माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या देशांतर्गत आरोग्य शिक्षणाच्या दर्जासाठी कोणतीही मानके कमी केली जाणार नाहीत. मात्र यात सर्वच भागधारकांच्या सूचना, निर्देश यांचा अभ्यास करून निर्णय घेण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात असल्याचे कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले.

यबाबत अधिक माहिती देताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी त्यांचे वैयक्तीक व शैक्षणिक तपशील भरून ते ई-मेलद्वारे eligibility@muhs.ac.in या ई-मेलवर पीडीएफ स्वरुपात देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

Last Updated : Mar 8, 2022, 1:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.