नाशिक - रणरणत्या उन्हात नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची आज सभा होत आहे. सभेची वेळ सकाळी १० वाजता होती. मात्र, अपेक्षित गर्दी होत नसल्याने सभेला उशीर होत आहे. त्यामुळे आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत गोडसे याच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री नाशकातील सभेत नागरिकांना संबोधित करणार आहेत. दुपारचे ११ वाजले तरी सभेमध्ये खुर्चा रिकाम्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. या रणरणत्या उन्हातील सभेला नाशिककर पाठ फिरवताना दिसून येत आहेत.