ETV Bharat / city

नाशकात कोरोनानंतर चिकनगुनिया, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ.. आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर - नाशिकमध्ये चिकनगुनिया व डेंग्यू रुग्णामध्ये वाढ

नाशिकमध्ये सध्या कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येत असतानाच आता डेंग्यू आणि चिकनगुनिया रोगांनी डोकं वर काढल्याने पुन्हा एकदा आरोग्य विभागाची डोके दुःखी वाढली आहे.शहरात डेंग्यूचे 266 तर चिकनगुनिया चे 233 रुग्ण आढळून आले आहेत.

Chikungunya and dengue
Chikungunya and dengue
author img

By

Published : Aug 1, 2021, 4:54 PM IST

Updated : Aug 1, 2021, 5:15 PM IST

नाशिक - नाशिकमध्ये सध्या कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येत असतानाच आता डेंग्यू आणि चिकनगुनिया रोगांनी डोकं वर काढल्याने पुन्हा एकदा आरोग्य विभागाची डोके दुःखी वाढली आहे.शहरात डेंग्यूचे 266 तर चिकनगुनिया चे 233 रुग्ण आढळून आले आहेत.

शहरात डेंग्यूचे 266 तर चिकनगुनियाचे 233 रुग्ण -

नाशिकमध्ये सध्या कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येत असतानाच आता डेंग्यू आणि चिकनगुनिया या रोगांनी डोकं वर काढल्याने पुन्हा एकदा आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. शहरात डेंग्यूचे 266 तर चिकनगुनियाचे 233 रुग्ण आढळून आलेत. पावसाळ्यात महापालिकेकडून फवारणी होत नसल्याने शहर वासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.कागदोपत्री पेक्षा प्रत्यक्ष रुग्णसंख्या जास्त असण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे.त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट वर आली आहे.

कोरोनानंतर चिकनगुनिया, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ
आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन ताप आलेल्या रुग्णांचे घेताय नमुने -
पावसाळा सुरू होताच इतर साथीच्या आजारांमध्ये वाढ होते म्हणून सध्या नाशिक शहरात डेंग्यू ,चिकनगुनिया या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. एडिस नावाचा डास चावल्यामुळे हा आजार होत आहे. हा डास स्वच्छ पाण्यात तयार होतो दिवसा हा डास चावतो, डेंग्यूचा चिकनगुनियाचा प्रादुर्भाव होत असल्याने महानगरपालिकेने परिसरातील टायर, नारळाच्या करवंट्या तसेच पाणी साचलेल्या ठिकाणी स्वच्छता करण्याच्या सूचना मनपाच्या अरोग्य विभागाने दिल्या आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन ताप आलेल्या रुग्णांचे नमुने घेत आहे. लवकरच हा प्रादुर्भाव कमी होईल, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ शकते -
कोरोनानंतर रोज नवनवीन अजाराचे व्हायरस येत आहेत. एका व्हायरसचे औषध उपचार शोधत असतानाच दुसरा तयार होत आहे. त्यामुळे दररोज आरोग्य विभागासमोर नवे अव्हान येत आहे. मास्क लावून सुद्धा पुन्हा पुन्हा लॉकडाऊन करावा लागत आहे. अमेरिका, ब्रिटन या सारख्या देशात तीन वेळा लॉकडाऊन करावा लागतो. शास्त्रज्ञ या आजारांवर औषधांचा शोध घेत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी स्वतः घेतली पाहिजे, पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ शकते, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

Last Updated : Aug 1, 2021, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.