ETV Bharat / city

'हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम'; आरक्षणावर भुजबळ म्हणाले... - Maratha reservation news

भुजबळ फार्म या निवासस्थानी छगन भुजबळ यांनी काल आरक्षणावर पत्रकारांशी संवाद साधला.

पालकमंत्री छगन भुजबळ
पालकमंत्री छगन भुजबळ
author img

By

Published : Dec 6, 2020, 4:31 PM IST

Updated : Dec 6, 2020, 4:55 PM IST

नाशिक - समता परिषद मराठा आरक्षणाविरोधात नाही. मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर ओबीसी गप्प बसणार नाही. तुम्ही धमक्या देता, लाठी-काठी तलवारीची भाषा करता. मग काय ओबीसी गप्प बसतील का? असा सवाल उपस्थित करत 'हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती', असे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले.

पालकमंत्री छगन भुजबळ

भुजबळ फार्म या निवासस्थानी छगन भुजबळ यांनी काल आरक्षणावर पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार कुठून आरक्षण देणार? मोर्चा काढून काय उपयोग? पवार यांनी मराठा समाजाला कधीच आरक्षण नाकारलं नाही. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी मोर्चे काढत आहोत. ओबीसी आणि समता परिषदेचे अनेक नेते सक्षम असल्याचे भुजबळ म्हणाले.

ओबीसीत मराठा समाज आला तर त्यांना काही मिळणार नाही-

27 ते 30 टक्के आरक्षण पवार साहेबांनी मिळवून दिले. यात ओबीसींना 17 टक्के आरक्षण आहे. आरक्षणात 450 जाती आहेत. ओबीसीत मराठा समाज आला तर त्यांना काही मिळणार नाही. ओबीसींच्या जुन्या आरक्षणाचा अनुशेष, सरकारनं भरून काढायला हवा. दरवर्षी राज्यात 7 हजार कर्मचारी निवृत्त होतात. भरती करायला नको का?, याचा विचार सर्व समाजानं करायला हवा, असे आवाहन भुजबळ यांनी यावेळी केले.

महाविकास आघाडीचा फायदा-

स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडी एक झाल्याचा फायदा झाला. नागपूर आणि पुणे हा आता भाजपचा बालेकिल्ला राहिला नाही. सुशिक्षित वर्गाने महाविकास आघाडीवर विश्वास दाखवत भाजपला नाकारले. धुळ्यात अमरीश पटेल यांचा विजय स्वबळावर होता. महाविकास आघाडी एकत्रित असली तरी धुळ्यात कार्यकर्ते अजून एकत्र दिसत नसल्याचे भुजबळ म्हणाले.

हेही वाचा- केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाची दखल घेतलेली दिसत नाही - शरद पवार

हेही वाचा- 'पुण्यातील जात पंचायतीचे प्रकरण दुर्दैवी, योग्य ती कारवाई होणार'

Last Updated : Dec 6, 2020, 4:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.