ETV Bharat / city

राज्यात २६ लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटप; छगन भुजबळांची माहिती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील कोणीही उपाशी राहता कामा, नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

chhagan bhujbal
राज्यात २६ लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटप; छगन भुजबळांची माहिती
author img

By

Published : Apr 9, 2020, 11:22 PM IST

नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील कोणीही उपाशी राहता कामा, नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरू असून १ ते ८ एप्रिल या आठ दिवसात राज्यातील १,००,४०,८२२ शिधापत्रिका धारकांना २५,८१,५९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप केल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने धान्य विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत राज्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहेत. या लाभार्थ्यांना ५२,४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रती कार्ड १५ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रती कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर पुरवण्यात येते. तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु किलो दराने प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रु किलो दराने प्रती व्यक्ती २ किलो तांदूळ दिला जातो.

राज्यात या योजनेमधून सुमारे १३,९६,१२१ क्विंटल गहू, १०,८४,३३० क्विंटल तांदूळ, तर १२,७७८ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचसोबत स्थलांतरीत झालेल्या आणि लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ४,६९,२१२ शिधापत्रिकाधारकांनी ते वास्तव्य करत असलेल्या त्याठिकाणी शासनाच्या पोर्टिबीलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना राबवण्यात येत आहे. पात्र रेनकार्ड धारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त मोफत तांदूळ 3 एप्रिलपासून टप्या-टप्याने देण्यात येत आहे. या योजनेसाठी 3 लाख 50 हजार 082 मे.टन तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहे. हे मोफत धान्य एप्रिलसोबतच मे आणि जून मध्येही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.