ETV Bharat / city

Menstruation Celebration : अंधश्रद्धेला छेद! लेकीच्या पहिल्या मासिक पाळीचा चांदगुडे दांपत्याकडून आनंद साजरा

author img

By

Published : Aug 4, 2022, 5:15 PM IST

Updated : Aug 4, 2022, 10:36 PM IST

नाशिकमध्ये लेकीच्या पहिल्या मासिक पाळीचा आनंदोत्सव नाशिकच्या ( Nashik )चांदगुडे दांपत्याने साजरा केला. मासिक पाळीबाबत समाजात असलेल्या अंधश्रद्धेला छेद ( Celebrating first menstruation of daughter ) देण्यासाठी हा उत्सव साजरा करण्यात आल्याचे विद्या चांदगुडे यांनी सांगितले आहे.

menstruation Celebration
पहिल्या मासिक पाळीचा आनंद साजरा

नाशिक - 'आता माझी पाळी, मीच देते टाळी' हे घोषवाक्य घेऊन नाशिकच्या ( Nashik )चांदगुडे दांपत्याने त्यांची कन्या यशदा चांदगुडे हिला तेराव्या वर्षी प्रथम मासिक पाळी आली म्हणून आनंदोत्सव साजरा केला. मासिक पाळीबाबत समाजात असलेल्या अंधश्रद्धेला छेद ( Celebrating first menstruation of daughter ) देण्यासाठी हा उत्सव साजरा करण्यात आल्याचे विद्या चांदगुडे यांनी सांगितले आहे.

अंधश्रद्धेला बगल देत उत्सव साजरा - नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आश्रम शाळेतील विद्यार्थिनीस मासिक पाळी आल्याने तिला वृक्षारोपणास नकार दिल्याची राज्यभर चर्चा होत असताना, या अंधश्रद्धेला छेद देण्यासाठी नाशिक येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे व त्यांच्या पत्नी विद्या चांदगुडे यांनी स्वतःच्या मुलीचा पहिल्याच मासिक पाळीचा उत्सव साजरा करत यासाठी त्यांनी निमंत्रण पत्रिका देखील छापली,अनेकांना निमंत्रित केले, मासिक पाळी हा विषय अंधश्रद्धा न मानता ही शारीरिक क्रिया असल्याची जनजागृती यातून करण्यात येते असल्याचं कृष्णा जाडगुडे यांनी म्हटलं ( Awareness of menstruation is physical activity ) आहे.

पहिल्या मासिक पाळीचा आनंद साजरा

तिच्या हातून जेवण - आधुनिक, वैज्ञानिक युगात आजही माहिलांना समाजात वावरतांना मासिक पाळी चारचौघात मोकळे वावरता येत नाही. मासिक पाळी हा शब्द सर्वांसोबत बोलण्याची आणि ऐकण्याची सवय समजाला नाही. अशात काही ठिकाणी आजही मासिक पाळीचे चार दिवस अस्पृश्य मानून महिलांना बाजूला बसवले जाते. त्याला छेद यावेळी यशोदाच्या हातूनच सर्वांना भोजन आणि पाणी देण्यात आले. हा विषय अंधश्रद्धा न मानता ही शारीरिक क्रिया असल्याची जनजागृती यातून चांदगुडे दाम्पत्यांनी केली आहे.

आनंदोत्सव माध्यमातून प्रबोधन - अंनिसच्या माध्यमातून शाळा,महाविद्यालयात मासिक पाळी बद्दल प्रबोधन केले जाते. या प्रबोधनाला जोड देण्यासाठी हा उत्सव साजरा केला गेला . यावेळी शहरातील 50 पती-पत्नींना निमंत्रित करण्यात आले. यावेळी तज्ञांनी चर्चासत्र च्या माध्यमातून मासिक पाळी विषय असलेली अंधश्रद्धा,स्वच्छता याबाबत प्रबोधन केले. यावेळी आईवडिलांनी यशोदाचे औक्षण करून तिला पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या, यावेळी गाणी, लघुपट व पुस्तिकेच तसेच सॅनिटरी नॅपकिनचे वाटपही करण्यात आले.

जनजागृती करण्याचा प्रयत्न - आमच्या कन्येला पाळी आल्यानंतर हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला . यातून मासिक पाळीबद्दल असलेली अंधश्रद्धा दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे . अशा प्रकारच्या कार्यक्रमातून समाजात जनजागृती होईल असं चांदगुडे दाम्पत्याने सांगितले.

हेही वाचा - Rahul Gandhi : राहुल गांधींचं मोदींना थेट चॅलेंज.. म्हणाले, 'काय करायचं ते करा, मी नरेंद्र मोदींना घाबरत नाही..'

Last Updated : Aug 4, 2022, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.