ETV Bharat / city

नाशकात स्मार्ट बस सेवेचे होणार उद्घाटन; फडणवीस-भुजबळ एकाच व्यासपीठावर

ससेवेचा उद्घाटनाच्या निमित्ताने राज्यातील दोन मोठे नेते हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. नुकत्याच संपलेल्या विधिमंडळातील गदारोळ त्याचे पडलेले पडसाद हे सगळे बघता फडणवीस आणि भुजबळ या दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे जनतेचे लक्ष राहणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील हे दोन्ही महत्वपूर्ण नेते एकमेकांना सल्ला देणार की कोपरखळी मारणार आणि त्यातूनही काही समन्वयाची भूमिका घेणार का? या सर्व घडामोडींकडे आता जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

फडणवीस-भुजबळ एकाच व्यासपीठावर
फडणवीस-भुजबळ एकाच व्यासपीठावर
author img

By

Published : Jul 8, 2021, 8:12 AM IST

Updated : Jul 8, 2021, 9:58 AM IST

नाशिक - बहुचर्चित आणि वादात सापडलेल्या शहरातील स्मार्ट बस सेवेच्या ड्रीम प्रोजेक्ट्सला अखेर उद्घाटनाचा मुहूर्त मिळाला आहे. विशेष म्हणजे आज (गुरुवारी) होणाऱ्या स्मार्ट सिटी बससेवेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री छगन भुजबळ हे दोघेही एका व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे या व्यासपीठावर उद्घाटनाच्या कार्यक्रमाबरोबरच राजकीय टोलेबाजी रंगण्याची शक्यता असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. नुकतेच पावसाळी अधिवेशना दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांच्या आरोपांना भुजबळ यांनी दिलेले सविस्तर उत्तर चर्चेचा विषय बनले होते. त्यानंतर आता ते एकाच व्यासपीठावर येत आहे.

भाजपने विरोधकांना न जुमानता बससेवेचा ड्रीम प्रोजेक्ट पुढे रेटला-

नाशिकच्या बहुचर्चित वादात सापडलेल्या स्मार्ट बस सेवेच्या ड्रीम प्रोजेक्ट्सला अखेर उदघाटनाचा मुहूर्त मिळाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा उदघाटन सोहळा गुरुवारी पार पडणार आहे. गेल्या कित्यक दिवसांपासून हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात होता. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात या प्रकल्पावरून चांगलीच जुंपली होती. परंतु सत्ताधारी भाजपने विरोधकांना न जुमानता आपला ड्रीम प्रोजेक्ट्स रेटत पुढे नेत सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकल्पामुळे पालिकेला कोट्यवधी रुपयाचा तोटा होणार असल्याने सुरुवातीला काही नगरसेवकांनी या प्रकल्पाला विरोध केला. नंतर मात्र साऱ्यांनीच बघ्याची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.

स्मार्ट बस या बीएस 6 असायला हव्या होत्या. मात्र बीएस-4 चे 10 वर्षांचे कंत्राट करण्यात आल्याने नाराजी पसरली आहे. त्यात आता पहिल्या टप्प्यात 50 बसेस सुरू करण्यात येणार आहेत. त्यात 30 सीएनजी तर 20 डिझेल बसेसचा समावेश करण्यात आला आहे. शहरात सुरू होणाऱ्या बसेस या सर्व सोयीसुविधायुक्त असणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

फडणवीस-भुजबळ एकाच व्यासपीठावर
भाजपाने 2017 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. त्यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या वचन नाम्यात नाशिक शहरामध्ये नागरिकांना अध्यावत अशी बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. भाजपाच्या या ड्रीम प्रोजेक्टसाठी नाशिक महानगरपालिकेत तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे, तसेच काही वरिष्ठ अधिकारी यांनी योजनेला मूर्त स्वरूप आणण्याचे काम केले. मात्र, कालातंराने महापालिकेतील भाजापाची सत्ता गेल्याने या स्मार्टबस सेवेची गती मंदावली. मंद गतीने पुढे सरकणाऱ्या या सेवेचे अखेर आज लोकार्पण केले जाणार आहे.

व्यासपीठावरील दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे जनतेचे लक्ष-

बससेवेचा उद्घाटनाच्या निमित्ताने राज्यातील दोन मोठे नेते हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. नुकत्याच संपलेल्या विधिमंडळातील गदारोळ त्याचे पडलेले पडसाद हे सगळे बघता फडणवीस आणि भुजबळ या दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे जनतेचे लक्ष राहणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील हे दोन्ही महत्वपूर्ण नेते एकमेकांना सल्ला देणार की कोपरखळी मारणार आणि त्यातूनही काही समन्वयाची भूमिका घेणार का? या सर्व घडामोडींकडे आता जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही नेते कशा प्रकारे विषयाला वाट मोकळी करणार की, या व्यासपीठावर त्या विषयाला बगल देणार हे देखील पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

Last Updated : Jul 8, 2021, 9:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.