नाशिक - भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. जर राज्यातील प्रत्येक मंदिरात ठाकरे-पवार यांच्या नावाने दानपेटी बसवली तरच मंदिरे उघडतील का? असा खोचक सवाल करत पुन्हा एकदा त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यभरातील आंदोलनानंतर भाजप आध्यात्मिक आघाडी मंदिर उघडण्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे या निमित्ताने दिसून आले.
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली मंदिरे ही उघडावीत यासाठी म्हणून भाजपच्या अध्यात्मिक आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनानंतर या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मंदिर उघडावी, अशी मागणी केली. या दरम्यान मनसेच्या वतीने पुणे व नाशिक येथे जोरदार आंदोलनही करण्यात आली. आता यानंतर पुन्हा एकदा भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष तुषार भोसले यांनी राज्य सरकार वरती निशाणा साधला आहे.
प्रत्येक मंदिरात एक 'ठाकरे-पवार नावाची दानपेटी बसवली तरच मंदिरं उघडणार का ? - भाजप आध्यात्मिक आघाडी
मंदिर उघडण्याच्या मागणीवरून तुषार भोसले म्हणाले की, ठाकरे सरकार मंदिर उघडण्यासाठी नागरिकांची आणि भक्तांची अजून किती प्रतीक्षा करणार आहे. प्रत्येक मंदिरात ज्या वेळेस ठाकरे- पवार दानपेटी बसवली तरचं मंदिर उघडणार का? असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. तसेच ज्या गोष्टींमध्ये सरकारची वसुली सुरू आहे. त्याच गोष्टी ठाकरे सरकार सुरू करीत आहे. अशी टीका भाजपाच्या वतीने ठाकरे सरकारवर करण्यात आली आहे.