ETV Bharat / city

नाशिकमध्ये शिवसेनेच्या आंदोलनानंतर भाजप आक्रमक, पदाधिकाऱ्यांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या

शिवसैनिकांनी मंगळवारी नाशिक मधील भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयाबाहेर जरमन शेफड श्वानांच्या गळ्यात नितेश राणे आणि नारायण राणे यांच्या नावाच्या पाट्या टाकून आंदोलन केले होते. दरम्यान या आंदोलनावेळी युवासेनेच्या आंदोलकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत या आंदोलकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने भद्रकाली पोलिसांना निवेदन देण्यात आले.

bjp-protest-over-shivsena-agitaion-with-dog-in-nashik
नाशिक
author img

By

Published : Mar 16, 2021, 5:20 PM IST

नाशिक - शिवसेनेने श्वान घेऊन आंदोलन केल्यामुळे भाजपा आक्रमक झाली आहे. आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना अटक करावी, या मागणीसाठी शहराध्यक्ष गिरिश पालवे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. यावेळी शिवसेनेला सत्तेचा माज आला असून तो उतरावा लागेल, असा हल्लाबोल त्यांनी केल‍ा आहे.

आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी -

भाजपा नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन वरुण सरदेसाई यांच्यावर खंडणी वसुलीचे गंभीर आरोप केले होते. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मंगळवारी नाशिक मधील भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयाबाहेर जरमन शेफड श्वानांच्या गळ्यात नितेश राणे आणि नारायण राणे यांच्या नावाच्या पाट्या टाकून आंदोलन केले होते. दरम्यान या आंदोलनावेळी युवासेनेच्या आंदोलकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत या आंदोलकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने भद्रकाली पोलिसांना निवेदन देण्यात आले. तसेच जोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाहीत, तोपर्यंत पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच आंदोलकांनी परवानगी घेऊन हे आंदोलन केले का? असा सवाल उपस्थित केला आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांवर कारवाईच्या मागणीसाठी नाशिकमध्ये भाजपाचे आंदोलन..

आंदोलनात प्राण्यांचा वापर करणे हा गुन्हा -

आंदोलनामध्ये युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्राण्यांचा वापर केल्याने युवा सेनेच्या आंदोलकांना भाजप कार्यालयात उपस्थित लोकांवर हल्ला करायचा होता का? असा सवाल देखील भाजपने उपस्थित केला आहे. कोणत्याही आंदोलनात प्राण्यांचा वापर करणे हा गुन्हा असून त्यांच्यावर शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने येत्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

आंदोलनाची ही कोणती पध्दत -

प्राण्यांना घेऊन आंदोलन करणे बंदी असताना श्वानांना घेऊन आंदोलन करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी पालवे यांनी केली. तसेच ही कोणती आंदोलनाची पद्धत आहे, असा जाब विचारत दोषींवर कारवाई होणार नसल्याने आम्ही देखील आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनकर्त्यांच्या तोंडाला मास्क नव्हते, मात्र सत्ता असल्याने सर्व गुन्हे माफ केले जात असल्याचा घणाघात भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी केला आहे.

हेही वाचा -नाशिक; शाळेची घंटा वाजणारच नाही! आता 31 मार्चपर्यंत बंद राहणार शाळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.