नाशिक - शहरातील हनुमानवाडी येथे गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांचे संवाद संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी जे. पी. नड्डा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थीत राहणार होते. मात्र, जवळपास अडीच तास नड्डा उशिरा दाखल झाले. त्यामुळे त्यांचे भाषण सुरू झाल्यानंतर लोक उठून जाऊ लागले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या संख्येने लोकांनी सभागृह सोडले. एकूणच हा प्रकार पाहून नड्डा यांनीही आपले भाषणही आटोपते घेतले.
रिकाम्या खुर्च्या आणि पदाधिकाऱ्यांची धावपळ
जे पी नड्डा यांच्या कार्यक्रमाची वेळ दुपारी १ वाजताची होती. मात्र कार्यक्रम स्थळी नड्डा जवळपास अडीच तास उशीरा दाखल झाले होते. यानंतर लोक उठून जात असताना नड्डा यांनी नाशिक शहराध्यक्षांना लोक उठून जात असल्याचे खुनवले देखील होते. भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी हे लोकांनी जाऊ नये यासाठी प्रयत्न केले, मात्र लोक थांबले नाहीत. अखेर हा प्रकार घडल्याने नड्डा यांनीही आपले भाषणही आटोपते घेतले.
हेही वाचा... .... आता पोत्यात पैसे नेले तर खिशात सामान येते - छगन भुजबळ
राज्यात भाजपला पून्हा निवडून देण्याचे नड्डांनी केले आव्हान
नड्डा यांनी आपल्या भाषणात 'काँग्रेसचे सरकार असताना त्यांच्याकडुन विकासाच्या नावावर भ्रष्टाचार सुरू होता' असा आरोप केला. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या एकाही मुख्यमंत्र्यांने 5 वर्ष पूर्ण केले नाही, संगीत खुर्चीप्रमाणे सत्तेचा वापर केला, अशी टीकाही नड्डा यांनी केली. फडणवीस यांच्या काळातच विकासाला गती मिळाली आहे. तसेच केंद्रात कलम 370 हटवल्याने कश्मीरात आदिवासी आरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्र शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगत मोदी सरकारच्या कामावर जनता खुश असल्याचा दावा नड्डा यांनी यावेळी केला.
हेही वाचा... जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना थारा देऊ नका, प्रणिती शिंदेंचे मतदारांना आवाहन