ETV Bharat / city

राम मंदिरासाठी भाजप कुठलीही वर्गणी गोळा करत नाही - गिरीश महाजन - girish mahajan news

श्री राम मंदिरासाठी भाजपकडून कुठलाही निधी गोळा केला जात नाही. फक्त आम्ही धार्मिक कामासाठी न्यास आणि विहिप यांना मदत करतो, असे मत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे.

Girish Mahajan
गिरीश महाजन
author img

By

Published : Mar 6, 2021, 8:29 PM IST

Updated : Mar 6, 2021, 9:10 PM IST

नाशिक - राम मंदिरासाठी भाजप कुठल्याही खंडण्या गोळा करत नाही किंवा पावतीवर मुख्यमंत्र्यांचे फोटो लावून फेरीवाल्यांकडून पैसे गोळा करत नाही. श्री राम आमचे दैवत असून, चांगल्या कामासाठी आम्ही न्यास आणि विहिप यांना मदत करतो, असे म्हणत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेला टोला लगावला. नाशिकला आयोजित पत्रकार परिषदेत महाजन बोलत होते.

गिरीश महाजन - माजी मंत्री

श्री राम मंदिरासाठी भाजपकडून कुठलाही निधी गोळा केला जात नाही. फक्त आम्ही धार्मिक कामासाठी न्यास आणि विहिप यांना मदत करतो, असे मत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. आम्ही इतरांप्रमाणे पावतीवर पक्षाचे चिन्ह आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो लावून फेरीवाल्यांकडून पैसे गोळा करत नाही, असे म्हणत महाजन यांनी सेनेला टोला लगावला.

निधीसाठी राज्य सरकारकडून भेदभाव

माजी मंत्री गिरीश महाजन आणि जयकुमार रावळ यांच्या उपस्थितीत नाशिक शहरातील जलकुंभांचे ऑनलाईन भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. शहरातील प्रस्तावित सोळा जलकुंभांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. या जलकुंभांसाठी 90 कोटींचा खर्च लागणार असून, शहरातील सहा विभागात जलकुंभांची उभारणी केली जाणार आहे. साडे चार लाख नागरिकांना पाणी व्यवस्थेसाठी 38 किलोमीटर अंतराची नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. शहरात 350 कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. यात 250 कोटींचे रस्ते, 90 कोटींचे जलकुंभ यांचा समावेश आहे. मेट्रोचा प्रकल्प मार्गी लागला असून केंद्र सरकारने अर्थसंकल्पात याबाबत तरतूद केली आहे. तसेच सुरत ते चेन्नई हा 176 किलोमीटरचा ग्रीन फिल्ड महामार्ग शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. तसेच शहरात घरोघरी पुरवठा करणारे गॅस पाईपलाईन याचंही काम प्रगतिपथावर आहे. नाशिक महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. विकास कामाच्या निधीसाठी राज्य सरकारकडून भेदभाव होत असल्याची नाराजी महाजन यांनी व्यक्त करत केंद्र सरकारकडून निधी आणून काम पूर्ण केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात अराजकता-

राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिंता करण्याच्या पलीकडे गेली आहे. हिरेनला सुरक्षा द्यावी ही देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मागणी केली होती. मात्र, दुपारी त्यांचा मृतदेह सापडला. अंबानी हे देशातील अत्यंत मोठे उद्योगपती असून, देशासाठी अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे. त्यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडते हे धक्कादायक असून, राज्यात अराजकता माजली असल्याचे महाजन यांनी सांगितले आहे. प्रत्येक घटनेत सचिन वझे यांची उपस्थिती कशी? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इतके योग कसे असू शकतात? वझे यांचा वावर हा संशयास्पद असून, या प्रकरणाची चौकशी एनआयएने करावी, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली.

हेही वाचा - भंडारा : लाखनी येथे भरधाव ट्रकने आजोबा-नातीला उडविले

हेही वाचा - 'उद्या मोदी नोटांवरील गांधीजींना हटवून स्वत:चाही फोटो लावतील'

Last Updated : Mar 6, 2021, 9:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.