नाशिक - स्थानिक कांदा संपत चालल्याने आता बंगलादेशने काद्यावरील ( Bangladesh lifts ban on onion imports ) आयात बंदी उठवली असून 2 जुलैपासून भारतातून बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ( India will export onion to bangladesh ) होण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे कांद्याच्या भावात काही प्रमाणात वाढ होणार असून, याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असे कांदा निर्यातदारांनी सांगितले आहे. बांगलादेशाने ( Bangladesh on onion imports ) ईद निमित्त भारतीय कांद्यावरील आयात बंदी 29 जून रोजी उठवली आहे. त्यामुळे, दोन जुलैपासून भारतीय बाजारपेठेतून बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होण्यास सुरवात होणार आहे. अशात आता कांदा महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ईद निमित्त भारतीय कांद्यावरील आयात बंदी - बांगलादेशाने ईद निमित्त भारतीय कांद्यावरील आयात बंदी 29 जून रोजी उठवली आहे. त्यामुळे, दोन जुलैपासून भारतीय बाजारपेठेतून बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होण्यास सुरवात होणार आहे. अशात आता कांदा महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक पातळीवर भारतीय कांद्याला बाजारपेठ म्हणून श्रीलंका व बांगलादेश हे महत्त्वाचे देश आहे. परंतु, बांगलादेशात यंदा स्थानिक कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात असल्याने दरात घसरण झाली होती.
यासाठी केली होती बंदी - बांगलादेशात यंदा स्थानिक कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात असल्याने दरात घसरण झाली होती. दराची घसरण थांबवण्यासाठी भारतातील कांद्यावर बांगलादेश सरकारने बंदी केली होती. सध्या बांगलादेशातील कांदा संपत असून, तसेच दरात वाढ होत असून बांगलादेशात ईदमध्ये कांद्याच्या मागणीत वाढ होईल म्हणून भारतीय कांदा आयात करण्यासाठी बांगलादेश सरकारने परवानगी दिली. त्यामुळे, दोन जुलैपासून भारतातील कांदा बांगलादेशात निर्यात होणार आहे. सध्या एक क्विंटलला दर 1100 ते 1700 रुपयांच्या दरम्यान असून त्यात आता वाढीची शक्यता आहे.
बांगलादेश मोठी बाजारपेठ - जागतिक पातळीवर भारतातील कांद्यासाठी बांगलादेश महत्त्वाची बाजारपेठ आहे. नाशिक जिल्ह्यातून रोज सर्वसाधारण 80 ते 90 हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी बाजारात येतो. तसेच, नाशिक मधूनच बांगलादेशमध्ये सर्वाधिक कांदा जात असल्याने दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असे कांदा निर्यातदारांनी सांगितले आहे. जागतिक पातळीवर भारतीय कांद्याला बाजारपेठ म्हणून श्रीलंका व बांगलादेश हे महत्त्वाचे देश आहे. मागील तीन महिने बांगलादेशने भारतीय कांद्याच्या आयातीवर बंदी घातली होती. त्यामुळे, दरात वाढ झाली नाही. मात्र, आता निर्यात सुरू होणार असल्याने काही प्रमाणात दरात वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कांदा निर्यातदार यांनी दिली.
हेही वाचा - सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ..एकाच दिवसात तब्बल 'इतका' भाव वधारला... पहा देशभरातील आजचे सोने- चांदीचे दर