ETV Bharat / city

कचराकुंडीत फेकून दिले स्त्री जातीचे अर्भक; रुग्णालयाच्या परिचारिका आईप्रमाणे करत आहेत सांभाळ - baby child

नासारडी नदीच्या बाजूला एका कचराकुंडीत प्लास्टिकच्या पिशवीत स्त्री जातीचे अर्भक फेकून देण्यात आले होते. अनाथ गोंडस मुलीचा येथील परिचारिका आईप्रमाणे सांभाळ करत असून त्यांना ह्या मुलीचा लळा लागला आहे.

कचराकुंडीत फेकून दिलेले अर्भक
author img

By

Published : May 17, 2019, 4:56 PM IST

नाशिक - शहरातील भारत नगर भागातील नासारडी नदीच्या बाजूला एका कचराकुंडीत प्लास्टिकच्या पिशवीत स्त्री जातीचे अर्भक फेकून देण्यात आले होते. रक्ताने माखलेल्या या अर्भकाला शिक्षिका मंदा शिंदे यांनी पाहिले आणि उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात एमआयसीयूत दाखल केले. या ठिकाणी परिचारिका या अर्भकाचा आईप्रमाणे सांभाळ करत आहेत.

अर्भकाविषयी माहिती देताना जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर
नाशिकमध्ये मातेच्या नावाला काळिमा फासणारी घटना घडली. एका कचरा कुंडीत प्लास्टिकच्या पिशवीत एका स्त्री जातीच्या अर्भकाला फेकून देण्यात आले होते. येथून जाताना मंदा शिंदे ह्या शिक्षिकेला कचरा कुंडीत पिशवी हलताना दिसली. म्हणून त्यांनी बघितले असता त्यांना स्त्री जातीचे अर्भक दिसले. त्यांनी तात्काळ याबाबत मुंबई नाका पोलिसांना कळवले.

पोलिसांनी या नवजात अर्भकला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या एमआयसीयू कक्षात दाखल केले आहे. अर्भक रुग्णालयात दाखल झाले तेव्हा ते रक्ताने माखले होते. अर्भकावर योग्य पद्धतीने उपचार सुरू असून आता प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हॉस्पिटलमधील डॉ. पंकज गाजरे, डॉ. कृष्णा पवार, डॉ. नरेंद्र बागुल, डॉ. श्रेयस पटेल, डॉ. दिनेश ठाकूर, परिचारिका वर्षा वामोरकर, काळे मॅडम, नीलिमा ठाकूर, श्रद्धा पाटील हे अर्भकाची काळजी घेत आहेत.

पुढील २ दिवसांनंतर अर्भकाला अशोक स्तंभ येथील अनाथ आश्रमात पाठवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अनाथ गोंडस मुलीचा येथील परिचारिका आईप्रमाणे सांभाळ करत असून त्यांना ह्या मुलीचा लळा लागला आहे. मुलगी नको म्हणून? की अनैतिक संबंधातून ह्या नवजात अर्भकाला फेकून देण्यात आले, ह्याचा शोध मुंबई नाका पोलीस घेत आहे.

Intro:नकोशी झाली हवीशी..हॉस्पिटलच्या परिचारिका बनल्या "त्या" चिमुकलीच्या माता....

Body:दोन दिवसांन पूर्वी नाशिकच्या नासारडी नदीच्या बाजुला असलेल्या कचरा कुंडीत शिक्षिका मंदा शिंदे ह्यांना स्त्री जातीचे नवजात अर्भक मिळून आले..रक्ताने माखलेलं ह्या अर्भकाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या एमआयसीयू कक्षात ठेवण्यात आले असून,येथील परिचारिका ह्या अनाथ मुलींचा आई प्रमाणे सांभाळ करत आहे...

नाशिक मध्ये मातेच्या नावाला काळिमा फासणारी घटना घडली आहे ..नाशिकच्या भारत नगर भागातील नासारडी नदीच्या बाजूला असलेल्या एका कचरा कुंडीत प्लस्टिकच्या पिशवीत एका स्त्री जातीच्या अर्भकाला फेकून देण्यात आलं होतं..ह्या परिसरातून जातांना मंदा शिंदे ह्या शिक्षिकेला कचरा कुंडीत पिशवी हलते म्हणून त्यांनी बघितलं असत त्यात हे अर्भक मिळून आलं, त्यांनी तात्काळ ह्याची माहिती मुंबई नाका पोलीसांना दिली पोलिसांनी ह्या नवजात अर्भकला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या एमआयसीयू कक्षात दाखल केले आहे...जेव्हा हे नवजात अर्भक रुग्णालयात दाखल झाले तेव्हा ते रक्ताने माखले होते, त्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरू असून आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले..हॉस्पिटलमधील डॉ पंकज गाजरे, डॉ कृष्णा पवार,डॉ नरेंद्र बागुल,डॉ श्रेयस पटेल,डॉ दिनेश ठाकूर, परिचारिका वर्षा वामोरकर,काळे मॅडम, नीलिमा ठाकूर श्रद्धा पाटील,आदी या मुलीची काळजी घेत आहे,पुढील दोन दिवसांनंतर ह्या मुलीला अशोक स्तंभ येथील अनाथ आश्रमात पाठवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले..आता ह्या अनाथ गोंडस मुलीचा येथील परिचारिका ह्या आई प्रमाणे सांभाळ करत असून त्यांना ह्या मुलीचा लळा लागला आहे..
.मुलगी नको म्हणून ? की अनैतिक संबंधातून ह्या नवजात अर्भकाला फेकून देण्यात आले ह्याचा शोध मुंबई नाका पोलीस घेत आहे..
बाईट
डॉ कृष्णा पवार

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.