ETV Bharat / city

पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत आत्मदहनाचा तरुणाचा प्रयत्न

author img

By

Published : Nov 11, 2021, 8:03 PM IST

अक्षय निकाळे याने केलेल्या आरोपानुसार नोव्हेंबर २०२०मध्ये संशयित किरण शेळके व नागेश शेलार यांनी खंडणी मागितली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र हा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी संशयित दबाव टाकत आहेत. काही दिवसांपूर्वी आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री अडवून संशयितांनी मारहाण केल्याचा आरोप अक्षयने केला असून आडगाव पोलिसांकडे तक्रार केली असता त्यांनी गुन्हा दाखल न करता नोंद घेतली. संशयितांवर कारवाई केलेली नाही. याबाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली मात्र ठोस कारवाई झालेली नाही.

पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत आत्मदहनाचा तरुणाचा प्रयत्न
पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत आत्मदहनाचा तरुणाचा प्रयत्न

नाशिक - मारहाण, दमदाटी करणाऱ्या संशयितांविरोधात पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करून पंचवटीतील एक पीडित तरुणाने पोलीस आयुक्तालयाच्या गेटबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित अक्षय निकाळेला ताब्यात घेतले आहे.

'गुन्हा मागे घ्यावा, यासाठी संशयित दबाव टाकत आहेत'

अक्षय निकाळे याने केलेल्या आरोपानुसार नोव्हेंबर २०२०मध्ये संशयित किरण शेळके व नागेश शेलार यांनी खंडणी मागितली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र हा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी संशयित दबाव टाकत आहेत. काही दिवसांपूर्वी आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री अडवून संशयितांनी मारहाण केल्याचा आरोप अक्षयने केला असून आडगाव पोलिसांकडे तक्रार केली असता त्यांनी गुन्हा दाखल न करता नोंद घेतली. संशयितांवर कारवाई केलेली नाही. याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली मात्र ठोस कारवाई झालेली नाही.

आत्मदहनाचा प्रयत्न

संशयितांमध्ये एक तडीपार असूनही तो मारहाण, दमदाटी करत असल्याचे अक्षयने सांगितले. या प्रकरणात भाजपा नगरसेविका महिलेचा पतीही दबाव टाकत असल्याने आडगाव पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप अक्षयने केला आहे. त्यानंतर अक्षयने पोलीस आयुक्तालयाबाहेर येत स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.