ठाणे Tyre Killer on Thane Roads : राज्यात मागील काही दिवसांमध्ये वाहतूक कोंडीचं प्रमाण देखील वाढलं आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणार्या अपघातामुळं मृत्यू होणार्यांची संख्या वेगाने वाढत आहे. आता रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळं होणारी वाहतूक कोंडी (Traffic) 'टायर किलर' (Tyre Killer) रोखणार आहे.
रस्त्यावर लागणार टायर किलर : रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणार्या वाहनामुळे होणारे अपघात लक्षात घेता, काही ठिकाणी वाहतूक विभाग निश्चित करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी 'टायर किलर' बसवण्यात येणार आहेत. तसेच या टायर किलरची माहिती देणारे माहिती फलक 100 ते 200 मीटर अंतरावर लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर टायर किलरवर पुरेसा प्रकाश देखील असणार आहे. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरा क्षेत्रात तो भाग असल्याचं निश्चित केल्यानंतरच त्या परिसरात टायर किलर बसवण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात टायर किलर बसवल्यानंतर तरी, या वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका होते का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
घोडबंदर मार्गावर मेट्रोच्या कामासाठी वाहतुकीत बदल : ठाण्यात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामांतर्गत रात्री जड, अवजड वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे. ज्या ठिकाणी गर्डरचं काम सुरू असेल त्याठिकाणी अवजड वाहनांना सर्विस रोडचा पर्याय असेल. मात्र, वाहतूक बंद कुठेही नसणार असल्याचं, वाहतूक शाखा उपयुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं.
काय आहे पर्याय : ठाण्यातले प्रलंबित असलेले दोन रस्ते झाले तर घोडबंदर रोडवर असलेला ताण कमी होऊ शकतो. एक गायमुख ते बाळकुम कोस्टल रोड आणि मोडेला चेक नाका ते गायमुख फॉरेस्ट रोडचा फायदा ठाणेकरांना होवू शकतो.
हेही वाचा -