ETV Bharat / city

नाशकात विनामास्क फिरणाऱ्या 94 जणांची कोविड सेंटरमध्ये रवानगी

author img

By

Published : Mar 20, 2021, 3:31 PM IST

नाशिक शहरात मागील 15 दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतं असल्याने नाशिक पोलीस रस्त्यावर उतरली आहे.

Departure of 94 unmasked people to Kovid Center in Nashik
नाशकात विनामास्क फिरणाऱ्या 94 जणांची कोविड सेंटरमध्ये रवानगी

नाशिक - नाशिक शहरात मागील 15 दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतं असल्याने नाशिक पोलीस रस्त्यावर उतरली आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या सह पोलीस अधिकाऱ्यांनी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांविरोधात धडक मोहीम सुरू केली असून आता पर्यंत 94 जणांवर कारवाई करत त्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये करण्यात आली आहे.

4 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह-

नाशिक जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून 15 दिवसात 13 हजारहुन अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. यात सर्वधिक रुग्ण हे नाशिक शहरातील आहेत. मात्र असं असतांना देखील नागरिकांना याचे गांभीर्य नसून अनेक जण सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरतांना दिसत आहे. या विरोधात आता नाशिक पोलीस रस्त्यावर उतरले असून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे हे स्वतः या मोहिमेत रस्त्यावर उतरले असून नाशिकच्या वेगवेगळ्या भागात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच त्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये करण्यात येत आहे. आतापर्यंत 94 नागरिकांना कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात येऊन त्यांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकीच 4 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

सिडको भागात 38 जणांवर कारवाई-

सलग तिसऱ्या दिवशी शहर पोलीस तसेच महापालिका यांच्या पथकाने वर्दळीच्या परिसरात पायी गस्त घातली. सिडकोत राबवण्यात आलेल्या या संयुक्त मोहिमेत विनामास्क फिरणाऱ्या 38 जणांवर कारवाई करताना त्यांना रॅपीड अँटीजन टेस्टसाठी पोलीस वाहनातून कोविड केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आले. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त अशोक नखाते, अंबड पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, शहर वाहतूक शाखा, महापालिका यांच्या अधिकाऱ्यांनी सिडकोतील त्रिमुर्ती चौक, दिव्या ॲडलॅब पवननगर, उत्तमनगर या वर्दळीच्या भागात पायी गस्त घातली. या दरम्यात तब्बल 38 जण विनामास्क वावरताना आढळले.

आतापर्यंत झालेली कारवाई-

पोलीस स्टेशन कोविड टेस्ट निगेटिव्ह पॉझिटिव्ह
भद्रकाली1091
सरकार वाडा32293
गंगापूर34340
मुंबई नाका18180

एकूण 168 जणांवर कारवाई करत 33 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा- अँटिलिया प्रकरणात सचिन वाझेंकडून एनआयएने करून घेतले नाट्य रूपांतर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.