ETV Bharat / city

कोरोना : नाशिकच्या ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटर उभारणार - छगन भुजबळ - नाशकात क्रेडाईकडून कोव्हीड सेंटर उभारणार बातमी

नाशिकमधील ठक्कर डोम येथे क्रेडाईच्या माध्यमातून ५०० खाटांच्या कोव्हीड केअर सेंटरसाठी सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना भुजबळ यांनी केली. त्यानंतर क्रेडाईच्या वतीने सदर कोव्हीड केअर सेंटरसाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे क्रेडाई अध्यक्ष रवी महाजन यांनी सांगितले.

ठक्कर डोम येथे ५०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले

author img

By

Published : Jun 21, 2020, 7:44 PM IST

नाशिक - शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे क्रेडाईच्या सहकार्याने ५०० खाटांचे सर्व सुविधायुक्त कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात येईल, अशी माहिती नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

नाशिकमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज छगन भुजबळ यांनी क्रेडाईच्या पदाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांची बैठक बोलावली होती. यावेळी सदर बैठकीला महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, उपाध्यक्ष कुणाल पाटील, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ठक्कर डोम येथे क्रेडाईच्या माध्यमातून ५०० खाटांच्या कोव्हीड केअर सेंटरसाठी सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना भुजबळ यांनी केली. त्यानंतर क्रेडाईच्या वतीने सदर कोव्हीड केअर सेंटरसाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे क्रेडाई अध्यक्ष रवी महाजन यांनी सांगितले.

या कोविड केअर सेंटरमध्ये महापालिकेच्या वतीने आवश्यक सर्व स्टाफ व आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात येऊन महापालिका अधिकारी यावर नियंत्रण ठेवणार असल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. क्रेडाईच्या माध्यमातून कोविडच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका रुग्णालयात पाच डिजिटल एक्सरे मशीन, पाच ईसीजी मशीन, १०० ऑक्सिमीटर, ५० थर्मल स्कॅनर, हेल्थ केअर अॅप, नाशिक जिल्हा रुग्णालयात प्रत्येकी १ हजार पीपीई किट, मास्क, नाशिक ग्रामीण पोलिसांना १ हजार पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर, नाशिक शहर पोलिसांना ३ हजार ५०० च्यवनप्राश बॉटल यासह ५ हजार गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य तसेच शासकीय निमशासकीय कार्यालयात १०० सॅनिटायझर स्टँड, १० सॅनिटायझर बूथ यासह विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आता ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटर तयार करून देण्यात येत आहे, असे क्रेडाई अध्यक्ष रवी महाजन यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.