नाशिक - सरकारी रुग्णालयाच्या कामांवर अनेक वेळा वेगवेगळ्या कारणांवरून टीका होते. मात्र, याच सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्या प्रयत्नांमुळे एका नवजात बाळाला जीवदान मिळाले आहे.
हेही वाचा - नाशिक : लॉन्समध्ये सुरू होती बनावट दारूनिर्मिती, 1 कोटी मुद्देमालासह 12 अटकेत
नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ साडेपाचशे ग्राम वजनी आणि वेळेआधी जन्मलेल्या बाळावर योग्य निदान आणि उपचार करत येथील डॉक्टर आणि नर्स यांनी बाळाला जीवदान दिले आहे. अशा प्रकारच्या कमी वजनी बाळावर उपचार करून त्याला व्यवस्थित घरी सोडल्याची ही पहिलीच घटना आहे.
फक्त 27 आठवड्यांच्या आणि साडे पाचशे वजनी बाळावर योग्य निदान करून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर, नर्स आदी स्टाफ यांनी त्यास जीवनदान दिले आहे. अडीच ते पावणे तीन महिने या बाळावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. हळू हळू बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्याचे वजन देखील वाढून साडे बाराशे ग्राम इतके झाले. आता बाळ सुरक्षित असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बाळावर योग्य निदान आणि उपचार झाल्याने या बाळाची प्रकृती आता आणखी सुधारली असून त्याचे वजन आता 1620 ग्राम इतके झाले आहे. हे पहिलेच बाळ आहे जे जिल्हा रुग्णालयात अतिशय कमी म्हणजेच, साडेपाचशे ग्राम वजनी आणि व्यवस्थित नीट होऊन गेले, असे या बाळावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा - धक्कादायक : पैसे न दिल्याने सर्पमित्राने कोब्रा लटकवला फ्लॅटच्या दाराला