ETV Bharat / city

Swimming Competition: वयाच्या 77 वर्षी आजीचे यश; जलतरण स्पर्धेत पटकवले तीन सुवर्ण दोन रौप्य - जयंती किशोर काळे

आवड,जिद्द,सातत्याच्या जोरावर वयाच्या 77 वर्षी नाशिकच्या जयंती काळे ( Jayanti Kishore Kale ) यांनी नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत तब्बल 3 सुवर्ण दोन रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. ( won 3 Golds In Swimming Nashiks )

Swimming Competition
जलतरण स्पर्धेत पटकवले तीन सुवर्ण दोन रौप्य
author img

By

Published : Oct 18, 2022, 2:12 PM IST

नाशिक : आजच्या धावपळीच्या जीवनात वयाच्या पंचाहत्तरी नंतर विना आधार चालणे कठीण होते, मात्र यावर मात करत वयाच्या 77 व्या वर्षी नाशिकच्या जयंती किशोर काळे ( Jayanti Kishore Kale ) यांनी आपल्या कौशल्याद्वारे 23 राज्यस्तरीय मास्टर्स एकव्हटीक चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत स्वीमिंगच्या सर्वप्रकारात आपली चुणूक दाखवत 3 सुवर्ण 2 रौप्य पदके पटकावली आहे. ( won 3 Golds In Swimming Nashiks ) आवड,जिद्द,सातत्याच्या जोरावर वयाच्या 77 वर्षी नाशिकच्या जयंती काळे यांनी नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ( Competition Held At Nanded ) तब्बल 3 सुवर्ण दोन रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहेत. तर 77 वर्षी त्यांनी पाण्यात लावलेली सूर सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

जिद्दीतून पटकावले अनेक पारितोषिक : जयंती काळे यांना दुसरीचे शिक्षण घेत असतानाच त्यांच्यात पोहण्याची आवड निर्माण झाली होती. विहीर, नदी या ठिकाणी त्या तासनतास पोहत असत, याच आवडीतून निर्माण झालेल्या जिद्दीतून त्यांनी अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अनेक पारितोषिक पटकावले आहे, जस जसे वय वाढत गेले तस तसे स्विमिंग बद्दल त्यांची आवड अधिकच वाढत गेली, त्यामुळे वयाच्या 77 व्या वर्षी देखील त्यांनी स्विमिंगचा सराव नियमितपणे सुरू ठेवला आहे. रोज सकाळी साडेसहा वाजता त्या नाशिकच्या वीर सावरकर जलतरण तलारावर सराव करतात.

वयाच्या 77 वर्षी आजींच यश; जलतरण स्पर्धेत पटकवले तीन सुवर्ण दोन रौप्य

असे पटकावले पदक : या सरावाच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेत अनेकांना त्यांनी मात देत 50 मीटर बटरफ्लाय,100 मीटर बटरफ्लाय व 50 मीटर ब्रेस्टस्टोक प्रकारात सुवर्णपदक व 50 मीटर फ्रीस्टाइल व मिडले या प्रकारात रौप्य पदकावर आपले नाव कोरल आहे,विशेष म्हणजे विविध वयोगटातील स्पर्धक यात सहभागी झाले, मात्र स्पर्धकांसह वयालाही मात देत या स्पर्धेत त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले त्यांच्या या कामगिरीची सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पालकांनी मुलानी प्रोत्साहन द्यावे : मी दुसरीपासून स्विमिंग करत आहे. आज माझ वय 77 वर्ष आहे. मात्र मी स्विमिंगचा सराव सोडला नाही, त्यामुळे मी अनेक ठिकाणींच्या स्पर्धेमध्ये यश संपादन करू शकले, मला वाटते पालकांनी आपल्या मुलींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मी घरातील मुलांसह सुना, नातवंडानाही स्विमिंगची धडे दिले आहेत. या वयातही मी स्वातंत्र्यवीर वीर सावरकर जलतरण तलावावर दररोज एक तास सराव करते, तसेच या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला मोफत मार्गदर्शन करते, असे जलतरणपटू जयंती काळे यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.