ETV Bharat / city

नाशकात गेल्या चार महिन्यांत 69 अल्पवयीन मुली बेपत्ता, केवळ 7 मुलींचा शोध घेण्यात यश - अल्पवयीन मुली बेपत्ता

नाशिक शहरात 1 मार्च ते 22 जूनपर्यंत 69 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून त्यापैकी केवळ 7 मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

nashik
nashik
author img

By

Published : Jun 25, 2021, 6:49 AM IST

नाशिक - कोरोना काळात नाशिक शहरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरात 1 मार्च ते 22 जूनपर्यंत 69 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून त्यापैकी केवळ 7 मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत असताना अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत गेले. विविध पोलीस ठाण्यात विविध कारणातून मुली घर सोडून गेल्याची नोंद करण्यात आली आहे. यातील बहुतांश मुली 15 ते 17 वयोगटातील आहे. लॉकडाऊन काळात सर्वच जण घरात होते. अशात अनेकांनी मोबाइलवर सोशल मीडियाचा सर्रास वापर केला. यातून अनोळखी व्यक्तींशी बोलणे, यातून निर्माण झालेले प्रेमसंबंध हे अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता होण्याचे मुख्य कारण ठरत आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी सर्वधिक अपहरणाचे गुन्हे अंबड आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. या दाखल गुन्ह्यातील सात मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले असून इतर मुलींचा शोध सुरू आहे.

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांची प्रतिक्रिया..

मुलांशी संवाद वाढवा..

या पिढीतील मुलांवर मोबाईलचा मोठा परिणाम होत आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांचे मन जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मुलांबरोबर मैत्रीपूर्ण संभाषणामुळे विश्वासाचे नाते दृढ होऊन पुढील मोठे दुष्परिणाम टाळले जाऊ शकतात, असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांनी व्यक्त केले.

अपहरणाचे पोलीस ठाण्यातील गुन्हे..

नाशिकरोड 11, अंबड 10, भद्रकाली 6, पंचवटी 7, सरकारवाडा 3, गंगापूर 4, मुंबई नाका 4, आडगाव 4, म्हसरुळ 5, देवळाली कॅम्प 4, सातपूर 3, इंदिरानगर 5.

मुलांवर दडपण नको..

लॉकडाऊन काळात मुलं घरात होती. त्यामुळे मुलांमधील कलागुणांना वाव मिळाला नाही तसेच घरात असून पालकांशी संवाद राहिला नाही. त्यामुळे मुलं सोशल मीडियाकडे वळली. मुलांबाबतचा अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी मुलांशी संवाद वाढवणे गरजेचे आहे. त्यांचे मन रमेल असं वातावरण घरात ठेवणे गरजेचे आहे, त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.