ETV Bharat / city

नाशकातून गुटख्याची अवैध वाहतूक, तीन जणांसह ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त - rakesh shinde

गुजरात येथून अवैधरित्या गुटखा आणणाऱ्या तीन जणांना मालेगाव विशेष पोलीस पथकाने वणी येथून अटक केली.

गुटख्यासह जप्त केलेली जीप
author img

By

Published : May 30, 2019, 9:21 AM IST

Updated : May 30, 2019, 2:25 PM IST

नाशिक - गुजरात येथून अवैधरित्या गुटखा आणणाऱ्या तीन जणांना मालेगाव विशेष पोलीस पथकाने वणी येथून अटक केली. त्यांच्याकडून २ पिकअप मालवाहू जीपसह एकूण ४६ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुटख्यासह जप्त केलेली जीप

गुजरात मार्गे महाराष्ट्रात सापुतारा-वणी रोडवर दोन पिकअपमधून अवैधरित्या गुटखा येणार असल्याची माहिती मालेगाव पोलिसांना मिळाली. त्यानंतर मालेगाव पोलिसांच्या विशेष पथकाने वणी रोडवर सापळा लावून वाहनांची तपासणी सुरू केली.

यात दोन मालवाहू पिकअपमधून (क्र.एम एच ४१ ए जे २७१४ व एम एच ४१ ए जे २४९४) मोहनभाई प्रेमभाई महाले, राजुकृष्णा मोहन चतुर्वेदी, रोहित राजू जाधव (तीघे रा. गव्हाण, जि. हवाडाग, गुजरात) हे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक करताना त्यांना आढळून आले. पोलिसांनी विमल पान मसाला, विमल पान, तंबाखू आणि दोन पिकअप वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणी मालेगाव पोलीस विशेष पथकाने वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Intro:गुजरात येथून अवैधरित्या गुटखा आणत असताना मालेगाव विशेष पोलीस पथकाने वणी येथे दोन पिकप सह एकूण 46 लाख 28 हजार असा मुद्देमाल सहित तीन आरोपींना अटक करण्यात आलीय..

Body:गुजरात मार्गे महाराष्ट्रात सापुतारा -वणी रोडवर दोन पिकप गुटका अवैधरित्या येनार असल्याची माहिती मालेगाव विशेष पथकाला मिळाल्यावर मालेगाव विशेष पथकाने वनी रोड वर गस्त घातली या तपासणीमध्ये वाहन क्रमांक एम. एच 41 एजे 2714 व एम एच 41ऐजे 24 94 या वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटका वाहतूक करताना मोहन भाई प्रेम भाई महाले, राजुकृष्णा मोहन चतुर्वेदी, रोहित राजू जाधव राहणार गव्हाण जिल्हा हवाडाग गुजरात ह्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी मालेगाव पोलीस विशेष पथकाने वणी पोलिसात गुन्हा दाखल केलाय

Conclusion:विमल पान मसाला, विमल पान, तंबाखू व दोन पिंकअँप वाहन किंमत अदाजे 110000 असा ऐकुण 46 लाख 28 हजार रुपये किंमतीचा मुद्देमालासह मिळून आल्याने सदर इसमाविरुद्ध वणी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे
Last Updated : May 30, 2019, 2:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.