नाशिक - नाशिकमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे 30 रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या रुग्णांमध्ये 1 रुग्ण हा नाशिक शहरातील तर, उर्वरित सिन्नर, येवला, नांदगाव, कळवण या तालुक्यातील असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. नाशिकमध्ये निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णयाला आठवडा उलटत नाही तोच आता डेल्टाचे संकट आल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग मात्र चांगलेच सतर्क झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
डेल्टाचे 30 रुग्ण पॉझिटिव्ह
नाशिकमधून राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेला 155 नमुने पाठवण्यात आले होते. त्यातील 30 नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून आला आहे. ज्या तालुक्यांमध्ये हे रुग्ण सापडले आहेत. त्या ठिकाणी अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे जिल्हाधिकार सूरज मांढरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - राज ठाकरेंच्या रक्तातच हिंदुत्त्व, मनसे-भाजप युती झाल्यास आनंदच - बाळा नांदगावकर