ETV Bharat / city

Schools Reopening In Nashik : नाशिकमध्ये १३ डिसेंबरपासून वाजणार शाळांची घंट‍ा, इयत्ता पहिली ते सातवी वर्ग होणार सुरु - महापालिका आयुक्त कैलास जाधव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी नाशिक शहरातील शाळा बंद (Nashik Schools Closed) ठेवण्यात आल्या होत्या. यातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग येत्या १३ डिसेंबरपासून पुन्हा सुरु (Schools Reopening In Nashik) करण्यात येणार आहेत. नाशिकच्या महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) हा निर्णय घेतला आहे.

schools in nashik
नाशिकमध्ये १३ डिसेंबरपासून वाजणार शाळांची घंट‍ा
author img

By

Published : Dec 10, 2021, 5:33 PM IST

नाशिक - महानगरपालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा येत्या सोमवारपासून (दि. १३) सुरु करण्याचा निर्णय (Schools Reopening In Nashik) महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने (Corporations Education Department) घेतला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 डिसेंबरपर्यंत शाळा बंद (Nashik Schools Closed) ठेवण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. एक डिसेंबरपासून महापालिकेच्या शाळा सुरु होणार होत्या. पण ओमायक्राॅनचे (Omicron Virus) संकट बघता महापालिकेने शाळा सुरु करण्याचा निर्णय दहा डिसेंबरपर्यंत पुढे ढकलला होता. मात्र, ओमायक्राॅनच्या संकटापासून नाशिक (Omicron Threat In Nashik) दूर असून, १३ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र भरून घेणार
शाळा सुरु करण्यासाठी कुठलीही अडचण नसल्याचा निर्वाळा आरोग्य मंत्र्यांनी नुकताच दिला होता. यानंतर महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (Education Officer Sunita Dhangar) यांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी नाशिक महापालिका हद्दीतल्या शाळा येत्या १३ डिसेंबरपासून सुरु होणार असल्याचे सांगितले. १ डिसेंबरला सुरु होणाऱ्या शाळा १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना महापालिका आयुक्त कैलास जाधव (Municipal Commissioner Kailas Jadhav) यांनी केली होती. त्यांनतर पुन्हा आढावा बैठक पार पडली. या दिवसांत महापालिका हद्दीतल्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र भरून घेत, विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यात यावे असे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे संमतीपत्र अनेक पालकांकडून भरून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय नेमकी कशी केली जाणार आहे. याबाबतची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.