ETV Bharat / city

धक्कादायक: ठेकेदाराने झाड तोडल्याने तब्बल 18 बगळ्यांचा मृत्यू, वनविभागाकडून कारवाई सुरू

गंगापूर रोड परिसरात असलेल्या एका बहरलेल्या झाडावर वंचक आणि गाय प्रजातीच्या बगळ्यांनी आसरा घेतला होता. मात्र यामुळे परिसरातील सुशील अपार्टमेंट आणि सिद्धी पूजा ग्लोरा अपार्टमेंटमधील रहिवाश्यांना पक्षांच्या विष्टेचा आणि झाडाच्या पानांचा त्रास होता.

Nashik
ठेकेदाराने तोडलेल्या झाडावरचे बगळे वाचवताना नागरिक
author img

By

Published : Aug 2, 2021, 3:02 PM IST

नाशिक - ठेकेदाराने झाडावर कुऱ्हाड चालवल्यामुळे तब्बल 18 बगळ्यांचा बळी गेला. ही संतापदायक घटना नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात घडली आहे. दोन इमारतीमधील वादात या पक्ष्यांचा बळी गेला आहे. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पक्षीप्रेमींकडून करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वनविभागाने ठेकेदाराचे साहित्य जप्त करुन कारवाई सुरू केली आहे.

तीन बगळ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिकमध्ये वेळोवेळी वृक्षतोड करण्यात येत असल्याचे अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे वृक्ष आणि पर्यावरण प्रेमींकडून सातत्याने याचा विरोध केला जातो. तरीही याची दखल घेतली जात नसल्याने 18 बगळ्यांना जीव गमवावा लागला आहे. गंगापूर रोड परिसरात असलेल्या एका बहरलेल्या झाडावर वंचक आणि गाय प्रजातीच्या बगळ्यांनी आसरा घेतला होता. मात्र यामुळे परिसरातील सुशील अपार्टमेंट आणि सिद्धी पूजा ग्लोरा अपार्टमेंटमधील रहिवाश्यांना पक्षांच्या विष्टेचा आणि झाडाच्या पानांचा त्रास होता. याबाबत त्यांनी महापालिकेकडे तक्रार केली. त्यानंतर क्षणार्धातच होत्याचे नव्हते झाले. या सोसायटी समोरील डेरेदार वृक्षावर महापालिकेच्या एका ठेकेदाराकडून दोरखंड लावून चेन सॉ मशीन चालवण्यात आली. यामुळे बगळ्यांनी झाडावर उभारलेली घरटी जमिनीवर पडल्याने पक्षाची अनेक अंडी आणि जवळपास 15 बगळ्याचा मृत्यू झाला. तीन बगळ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पक्षीप्रेमींनी व्यक्त केला संताप, प्रकरणाच्या चौकशीची मागणी

या घटनेची माहिती मिळताच इको फाऊंडेशनच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी बगळ्यांना उपचारासाठी पशूवैद्यकीय तपासणीसाठी रवाना केले. मात्र घडलेल्या या प्रकाराबाबत त्यांनी रोष व्यक्त केला. संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पक्षीप्रेमींनी यावेळी केली आहे. अनेक ठिकाणी नवीन किंवा जुन्या बांधकामांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वृक्षाची विना परवानगी सर्रास कत्तल केली जात आहे. यापुढे शहर परिसरात झाड तोडताना झाडावर कुठल्याही प्रकारची जैव-विविधता नसल्याचा दाखला घेण्यात यावा, महापालिका आणि वन विभागाची परवानगी घेऊनच झाड तोडण्यात यावे, अशी मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे.

वनविभागाने केले ठेकेदाराचे साहित्य जप्त

ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि रहिवाश्यांचे दुर्लक्ष, यामुळे थेट झाडाच्या खोडावर मशीन चालवण्यात आली. यामुळे या बगळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे जैवविविधतेला बाधा पोहोचल्याने वनखात्याने यावर कारवाई करत साहित्य जप्त करत या झाडाची कत्तल रोखली आहे. तर संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई देखील सुरू केली. फांद्या छाटण्याऐवजी ठेकेदाराने ते झाडाच्या खोडावर मशीन चालवल्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षांचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पक्षीप्रेमींकडून केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.