ETV Bharat / city

Nashik Brothel : नाशिकच्या भद्रकाली भागातील दीडशे वर्षपूर्वीचा कुंटणखाना पोलिसांकडून सील - भद्रकाली पोलिसांची कुंटणखान्यावर कारवाई

भद्रकाली ठाकरे गल्ली परिसरातील दीडशे वर्षे पूर्वीचा कुंटणखाना (Nashik 150 Year Old Brothel Seal ) भद्रकाली पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. यावेळी कुंटणखान्यावर महिलांनी आणि पोलिसांमध्ये (Thackrey Galli Brothel) शाब्दिक चकमक झाली.

Nashik 150 Year Old Brothel Seal
Nashik 150 Year Old Brothel Seal
author img

By

Published : Dec 11, 2021, 4:31 PM IST

नाशिक - भद्रकाली ठाकरे गल्ली परिसरातील दीडशे वर्षे पूर्वीचा कुंटणखाना (Nashik 150 Year Old Brothel Seal ) भद्रकाली पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. यावेळी कुंटणखान्यावर महिलांनी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तसेच काही महिलांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याची धमकी दिली.

  • अनेक घरांमध्ये बेकायदेशीररित्या कुंटणखाना -

आठवडाभरापुर्वीच पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६च्या कलम ७ नुसार अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेत त्यांनी शाळा, प्रार्थनास्थळ, शैक्षणिक संस्था, वसतीगृह, रुग्णालय, आदी सार्वजनिक ठिकाणांपासून 200 मीटरच्या अंतरापर्यंत देहविक्री करण्यास प्रतिबंध असल्याचे घोषित केले. तसेच कुंटणखान्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्याकडून मागण्यात आली होती. भद्रकाली परिसरातील ठाकरेगल्ली भागात दोन विविध ठिकाणी अनेक घरांमध्ये बेकायदेशीररित्या गेल्या दीडशे वर्षांपासून कुंटणखाना सुरू असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांकडून पोलीस आयुक्तांना पाठवण्यात आली होती. याबाबत आयुक्तांनी संबंधित कुंटणखाना चालकांवर कारवाई करण्याचे भद्रकाली पोलिसांना आदेशित केले होते. तसेच देहविक्री करणाऱ्या महिलांना येथून स्थलांतरित होण्यास सांगितले होते.

  • अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याची धमकी -

या आदेशनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार, पोलीस निरीक्षक दीपक ठाकूर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर खांडवी, प्रणिता पवार तसेच महिला व पुरुष पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कुंटणखान्यातील महिलांना बाहेर पडण्यासाठी काही वेळ दिला. त्यांनी काही वेळ विरोध करत येथून कुठे जाणार कुठलीही व्यवस्था नाही. असे म्हणत स्थलांतर होण्यास नकार दिला. यावेळी येथील महिला आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली, काही महिलांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याची धमकी दिली. मात्र, महिला पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत काढत त्यांना बाहेर काढले. त्यानंतर संपूर्ण कुंटणखान्यातील रूममधील तपासणी करत लहान मुले किंवा महिला आत राहिले नाही ना, याची खात्री करत शासकीय पंच यांच्या उपस्थितीत ठाकरे गल्ली येथील दर्शनी भागातील तसेच संदर्भ रुग्णालयाच्या मागील भिंतीस लागून असलेल्या कुंटणखान्यावर कारवाई करत सील करण्यात आले.

  • पत्रे लाऊन वेल्डींग -

देहविक्री करणाऱ्या महिलांना सील तोडता येऊ नये म्हणून बाहेरून पत्रे लाऊन तसेच वेल्डिंगकरून कायमस्वरूपी कुंटणखाना सील करण्यात आला. दर्शनी भागातील कुंटणखान्यात चालकांनी न्यायालयाची स्थगिती असल्याचे कागदपत्र पोलिसांसमोर सादर केले. मात्र, संबंधित कागदपत्र वेगळे असल्याने पोलिसांनी कारवाई सुरू ठेवली.

  • राजकीय हेतूने कारवाई -

राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून कारवाई झाल्याचा आरोप देहविक्री करणाऱ्या महिलांनी केला. यावेळी या महिलांनी त्याच्या विरोधात परिसरात घोषणाबाजी करत शिवीगाळ केली. मात्र, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी महिलांना तेथून काढून दिले.

हेही वाचा - MIM On Muslim Reservation : मुंबईत एमआयएमची तिरंगा रॅली, गृहमंत्री म्हणाले, मोर्चाला बंदी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.